विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. हे ग्राफिक कार्ड शेअर करत दावा केला जात आहे की, “भाजप नेते मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक फेक असून एबीपी माझाद्वारे जारी करण्यात आली नाही. तसेच मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची बातमी माध्यमांमध्ये नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल ग्राफिकमध्ये एबीपी माझाचा लोगो आणि मंगेश चव्हाण यांचा फोटो दिसतो. सोबत लिहिले होते की, “चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान, चाळीसगांवमध्ये संतापाचं वातावरण.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम आमदार मंगेश चव्हाणांनी शिवाजी महाराजांवर कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले असते तर ती मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणती बातमी माध्यमांवर आढळत नाही.
तसेच एबीपी माझाने अशी बातमी आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केल्याचे आढळत नाही.
या उलट एबीपी माझाने 20 नोव्हेंबर रोजी आपल्या फेसबुक पेजवर हे ग्राफिक फेक असत्याचे स्पष्ट केले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, एबीपी माझाच्या नावे विविध विधानसभा मतदारसंघात खोट्या इमेज/स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही. या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून एबीपी माझाद्वारे जारी करण्यात आला नाही. तसेच आमदार मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची कोणत्या ही अधिकृत माध्यामांवर नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भाजप नेते मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही; फेक ग्राफिक व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Altered
