
शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. याच पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांच्या चेंबूरमधील प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानाचा झेंडा फडकविण्यात आला, या दाव्यासह त्यांचा रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानाचा नाही तर इस्लामिक झेंडा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रॅलीमध्ये एका क्रेनला बांधलेला फुलांचा हार आणि त्यावर हिरवा चांदसितारा झेंडा दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ही आहे उबाठा सेनेचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर मधील प्रचार सभा. भारतात पाकिस्तानचा झेंडा.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
व्हायरल व्हिडिओमधील हिरव्या झेंड्याचे निरीक्षण केल्यावर दिसते की, त्यावर अर्धचंद्र, एक मोठा तारा व अनेक लहान तारे आहेत. परंतु, पाकिस्तानच्या ध्वजामध्ये एक पांढऱ्या रंगाची पट्टी आणि अर्धचंद्र व एक तारा असतो.
अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील हिरवा झेंडा इस्लामिक ध्वज आहे.

मूळ पोस्ट – फ्लिपकार्ट
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला इस्लामिक आणि पाकिस्तानच्या ध्वजमधील फरक लक्षात येईल.

राजकाज न्यूजने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर 14 मे रोजी बातमी प्रकाशील केली होती. बातमीच्या शीर्षकात लिहिले होते की, “शिवसेनेच्या उबाठा रॅलीत कथितपणे इस्लामिक ध्वज दिसल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली.”
तसेच एशियानेट न्यूजनुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी नकारात्मक टिप्पनी केली.
परंतु, सदरील दोन्ही बातमीमध्ये पाकिस्तानी ध्वजाचा उल्लेख केला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनिल देसाई यांनी 14 मे रोजी चेंबूरमध्ये रोड-शोचे अयोजन केले होते.
खालील इंस्टाग्राम पोस्टमध्ये रोड-शो आणि तो आयोजित केलेल्या ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे.

मूळ पोस्ट – इंस्टाग्रम | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखलेला इस्लामिक ध्वज आहे. शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तान ध्वजचा नाही. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:ऊबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
