
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून विविध माध्यामांवर एक्झिट पोलचे अंदाज दाखवण्यात येत आहे. अशा एका एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या एक्झिट पोलमध्ये दावा केला जात आहे की, भाजप खासदार मनोज तिवारी यांची ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये एबीपी न्यूजच्या लोगो सहित एक्झिट पोलचा परिणाम दाखवण्यात आला आहे की, यंदा निवडणुकीत इंडिया आघाडीला 258 ते 286 जागा तर एनडीएला 232 ते 253 जागा मिळू शकतात. तसेच उत्तर भारतमध्ये एनडीए आघाडीला 90 ते 110 जागा तर इंडिया आघाडीला 70 ते 90 मिळण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. तसेच ईशान्य दिल्लीतील भाजप नेते मनोज तिवारी यांची जागा धोक्यात आली आहे. (भाषांतर)
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिलेल्या महितीच्या आधारे कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरह होत असलेले एक्झिट पोल एडिट करण्यात आले आहे.
एबीपी न्यूजने मूळ सर्वेक्षणाशी संबंधित व्हिडिओ रिपोर्टचा हा व्हिडिओ 26 डिसेंबर 2023 रोजी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता.
एबीपी न्यूजने शेअर केलेल्या व्हिडिओमधील ओपिनियन पोलनुसार, भारतीय आघाडीला 165 ते 205 जागा तर एनडीएला 295 ते 335 जागा मिळू शकतात आणि उत्तर भारतमध्ये एनडीए आघाडीला 150 ते 160 जागा तर इंडिया आघाडीला 20 ते 30 जागा मिळण्याची शक्यता दाखवण्यात आली.
तसेच या ठिकाणी भाजप खासदार मनोज तिवारी यांना मागे असल्याचे सांगितले नाही.
काही दिवसांपूर्वी असाच एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. यामध्ये, एनडीए आघाडीला 232 ते 253 जागा तर इंडिया आघाडीला 258 ते 286 जागा मिळण्याची शक्यता दाखवण्यात आली होती. एबीपी न्यूजने 28 मे रोजी आपल्या अधिकृत फेसबुकवरून त्यांचे खंडन केले की, “ओपिनियन पोलबाबत एबीपी न्यूजचा बनावट स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी बातमी एबीपी न्यूजवर प्रसारित केली नाही. अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध रहा.”
खालील तुलनात्मक फोटोपाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ व्हिडिओमधील स्क्रीनशॉटला एडिट करून पक्षांच्या जागेच्या संख्यामध्ये फेरबदल केली आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे. मूळात एबीपी न्यूजने हा ओपिनियन पोल 26 डिसेंबर 2023 रोजी जाहिर केला होता. ज्यामध्ये इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा तर एनडीएला 295 ते 335 जागा मिळ्याची शक्यता दाखवी गेली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मनोज तिवारींच्या ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात दाखवणारा एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट एडिटेड आहे; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
