
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतीय लष्कराची गोपनीय माहिती दिल्याचा आरोपावरुन युट्यूबर ज्योती मल्होत्राला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे दोन फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “या फोटोमध्ये राहुल गांधींसोबत दिसणारी महिला युट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिटेड आहेत.
काय आहे दावा ?
व्हायरल दोन फोटोमध्ये राहुल गांधींसोबर एक महिला दिसते.
युजर्स हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हरियाणा ते पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात पकडलेली ज्योती मल्होत्रा राहुल गांधी सोबत.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
खालील दोन्ही फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो एडिटेड असून यामधील महिला ज्योती मल्होत्राचा नाही.
फोटो क्र. 1
डेक्कन हेराल्ड, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस, डीएनए आणि फ्री प्रेस जर्नल या वृत्तांनी आपल्या वेबसाईटवर मुळ फोटो शेअर केला होता.
वरील सर्व वृत्तांच्या बातमीनुसार या मुळ फोटोमध्ये राहुल गांधींसोबत आमदार अदिती सिंह दिसतात.
अदिती सिंह या उत्तर प्रदेश विधानसभा या जागेवरून पाच वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांच्या त्या कन्या आहे. अदिती सिंह यांनीदेखील 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती. तथापि, 2021 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ फोटोला एडिट करून अदिती सिंह यांच्या चेहऱ्याच्या जागी ज्योती मल्होत्राचा चेहरा लावण्यात आला आहे.
फोटो क्र.2
राहुल गांधींनी 18 सप्टेंबर 2022 रोजी मुळ फोटो आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन शेअर केला होता.
यामध्ये ते भारत जोडो यात्रेदरम्यान केरळमधील अलाप्पुझा येथे भेटलेल्या एका महिलेसोबत दिसत आहेत.
मूळ पोस्ट — फेसबुक
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ फोटोला एडिट करून त्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचा चेहरा लावला आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दोन्ही फोटो एडिट केले आहेत. मुळात पहिल्या फोटोमध्ये राहुल गांधींसोबत आमदार अदिती सिंह आहे. तर दुसरा फोटो भारत जोडो यात्रादरम्यानचा असून त्याला एडिट करुन ज्योती मल्होत्राचा चेहरा लावलेला आहे. खोट्या दाव्यासह हे फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधींसोबत व्हायरल फोटोमधील महिला आरोपी युट्यूबर ज्योती मल्होत्रा नाही; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
