
रितेश देशमुखने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीकात्मक टिप्पणी करणारे ट्विट शेअर केले, या दाव्यासह एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट रितेश देशमुख यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये रितेश देशमुख यांचा फोटो आणि नावा पुढे ब्लू टिक दिसते.
मजकुरामध्ये लिहिले आहे की, “मोहन भागवत जी, 15 वर्षात नाही तर 15 दिवसात अखंड भारत निर्माण करा, तुमच्याशी कोणी बोलायलाही येणार नाही, कोणीही प्रश्न विचारणार नाही, संपूर्ण मुस्लिम समाज तुम्हाला साथ देईल. राहिली गोष्ट खोडून काढण्याची, ते तर तुमच्या चड्डी गँग कडून होणार नाही, कारण जेव्हा कारण जेव्हा नामशेष होण्याची वेळ आली होती, तेव्हा इंग्रजांचे गुप्तहेर बनत 60 ₹ च्या पेन्शनसाठी विकले गेले. इथल्या मातीत सगळ्यांचे रक्त सामावले आहे. ज्यांनी इंग्रजांकडून ६० रुपये पेन्शन घेतली आहे, त्यांच्या बापाचा हिंदुस्थान थोडाच आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम रितेश देशमुख यांनी खरंच असे ट्विट केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट रितेश देशमुख यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा नाही.
रितेश देशमुख यांच्या नावाने पॅरडी अर्थात विडंबन ट्विटर आकाउंट तयार करण्यात आले आहे. हे अकाउंट जानेवारी 2024 पासून ट्विटरवर उपलब्ध आहे.
या पॅरडी आकाउंटने 14 डिसेंबर रोजी व्हायरल पोस्ट शेअर केली होती.
रितेश देशमुख यांचा आधिकृत ट्विटर अकाउंटवर अशी कोणतेही पोस्ट आढळत नाही.
खालील तुलनात्म फोटो पाहिल्यावर आपल्याला पॅरडी आणि आधिकृत ट्विटर अकाउंटमधील फरक आढळेल.
मोहन भागवत वक्तव्य
आरएसएस प्रमुख मोहन भागवत 2020 मध्ये हरिद्वारामधील एका कार्यक्रमात भाषण करताना म्हणाले की, “भारताला 20 ते 25 वर्षांत अखंड भारत व्हायचे आहे. परंतु, इथल्या लोकांनी थोडे प्रयत्न केले तर अवघ्या 10 -15 वर्षात हे शक्य होईल.”
अधिक माहिती येथे व येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल स्क्रीनशॉट रितेश देशमुख यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा नाही. रितेशच्या नावाने तयार केलेल्या एका पॅरडी अकाउंटने हे ट्विट केले आहे. खोट्या दाव्यासह हा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:रितेश देशमुखने मोहन भागवतांवर टीका केली नाही; पॅरडी अकाउंटचे स्क्रीनशॉट व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
