पंतप्रधानांनी बांगलादेशावर हल्ला केला नाही तर राजीनामा द्यावा; असे योगी आदित्यनाथ म्हटले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारमध्ये एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “हिंदुवर हल्ला करणाऱ्या बांगादेशवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ला करू शकत नसाल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे एडिट केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेत बोलताना दिसतात की, “जर बांगलादेश पाकिस्तान झाला नसता, तर अशा प्रकारे हिंदूंना जाळले गेले नसते; जर तसे केले असते, तर त्याची काय दुर्दशा झाली असती, हे त्यालाही माहीत आहे. पंतप्रधान मोदीजी, जर आपण बांगलादेशावर आक्रमण करू शकत नसाल, तर पंतप्रधानपद सोडून द्या. आम्ही धर्मसैनिक आहोत; आमच्या धर्मयुद्धातून बांगलादेशाला पुन्हा अखंड भारताचा भाग बनवू. हे सर्व पाकिस्तानचा आसिम मुनीर करून घेत आहे. जोपर्यंत आसिम मुनीर पाकिस्तानात राहील, तोपर्यंत भारत संकटात आहे. आमचा आदेश आहे की आसिम मुनीरला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवली जावी, जेणेकरून पाकिस्तान आपल्या जागेवर राहील.”

व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “मोदीजी प्रधानमंत्री पद सोडून द्या. योगी आदित्यनाथ यांचा थेट मोदींना आदेश; तुमच्या कडून होत नसेल तर सांगा.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करतान कॅप्शनमध्ये लिहितात की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांनी Pakistan वर Bangladeshच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे.यावेळी त्यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल Syed Asim Munir यांच्यावर तीव्र टीका करत थेट जीवघेण्या धमक्या दिल्याचा दावा केला आहे.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यवर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री योगी भाषण करत होते.

एएनआयने 25 डिसेंबर 2025 आपल्या युट्यूब चॅनलवरुन या अधिवेशनाचे थेट प्रेक्षेपण केले होते.

या अधिवेशनात 5 तास 26 मिनिट 30 सेकंदावर योगी आदित्यनाथ म्हणतात की, बांगलादेशातील हिंदूंचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात; परंतु, या ठिकाणी ते पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत नाही. हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

आज तक’च्या बातमीनुसार, उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि तेथील हिंदूंवरील कथित अत्याचारांवर जोरदारपणे आपले विचार व्यक्त केले. परंतु, त्या वृत्तांतात व्हायरल व्हिडिओचा उल्लेख केलेला नाही.

मूळ भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधीपक्षावर टीका करताना म्हणतात की, बांगलादेशमध्ये एका दलित हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली, पण सहानुभूती व्यक्त करणारे आवाज शांत आहेत. गाझावर अश्रू ढाळले जातात, पण हिंदूंच्या हत्येवर नाही. हा न्याय नाही, तर मतपेढीचे राजकारण आहे. या अन्यायाचा उघड निषेध केला पाहिजे.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून दिशाभूल करणारे वक्तव्य पसरविले जात आहे.

बांगलादेशमधील तरुणाची हत्या

बांगलादेशमधील मैमनसिंह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून पेटवून देण्यात आला. या अमानवीय घटनेमुळे जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दीपू चंद्र दास असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी ढाका येथील रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनने एकूण सात जणांना अटक केली आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एआय तंत्रज्ञान वापरून एडिट केलेला आहे. मुळात योगी आदित्यनाथ बांगलादेशातील हिंसाचार उल्लेख करुन विरोधकांवर करत होते. परंतु,  त्यात ते पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:पंतप्रधानांनी बांगलादेशावर हल्ला केला नाही तर राजीनामा द्यावा; असे योगी आदित्यनाथ म्हटले का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *