
भारतातील बाजार सर्वात स्वस्त कार म्हणून टाटा कंपनीच्या नॅनोकडे पाहिले जाते. याच पार्श्वभूमीवर एका कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात टाटा कंपनीने नॅनोचे नवीन मॉडल लाँच केले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. हा फोटो टाटाच्या नॅनोचा नसून चीनी कंपनी BYD ने ही इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये हिरव्या रंगाची छोटी कार दिसते.
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “टाटा नॅनो आता पुन्हा घेऊन येत आहेत. नवीन अवतारात, फक्त 1.65 लाखात.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो टाटा कंपनीची कार नाही.
रशलेन नामक वेबसाईटने 17 ऑगस्ट 2023 रोजी व्हायरल फोटोमधील सारख्या कारचे फोटो शेअर केले होते. सोबत माहिती दिली की, “ही कार BYD नावाच्या कंपनीने तयार केली असून ही एक इलेक्ट्रिक कार आहे.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, BYD चायनाची कंपनी असून त्यांचे मुख्यालय शेन्झेन, ग्वांगडोंग येथे आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक कार तयार करतात. अधिक महिती आपन येथे व येथे वाचू शकता.
खलील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल फोटोमध्ये BYD कंपनीचा लोगो हटवून कारवर टाटा कंपनीचा लोगो लावण्यात आला आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. हा फोटो टाटाच्या नॅनोचा नसून चीनी कंपनी BYD ने ही इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. खोट्या दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:टाटा कंपनीने नॅनोचे नवीन मॉडल लाँच केले का? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
