लडाख पोलिसांनी ‘अमित शाहांच्या अदेशावरुन सोनम वांगचूकांना अटक केली’ असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य 

Altered राजकीय | Political

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली लेहमध्ये अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लेहचे पोलिस अधिकारी म्हणतात की, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रालयातून सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावत त्यांना अटकेचे आदेश देण्यात आले होते.

दावा केला जात आहे की, लडाखमधील लेह पोलिसांनी मान्य केले की, अमित शाह यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट असून पोलिसांच्या वक्तव्यात बदल करून खोट्या दाव्यासह पसरविला जात आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये लेह पोलिस अधिकारी म्हणतात की, “लेहमधील दुर्दैवी घटनेनंतर 90 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि सात जण गंभीर जखमी झाले. मी लडाखच्या जनतेला सांगू इच्छितो की, आम्हाला गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. आम्हाला अमित शहा यांच्या कार्यालयाकडून आदेश मिळाला होता की, तुम्ही वांगचुक यांच्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करावा. आम्ही लेहच्या जनतेला विनंती करतो की, पोलिसांवर हल्ला करु नये. अपल्या समस्या भाजप कार्यालयात सांगाव्या, विनाकारण आम्हाला लक्ष करु नये. आम्ही फक्त कर्मचारी आहोत.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले – गृहमंत्रालयातून अमित शाह द्वारे आदेश काढण्यात आले श्री सोनम वांगचूक सर यांच्या अटकेचे आणि पोलिसांना निर्देश देण्यात आले की त्यांच्यावर खोटे देशद्रोहाचे खटले चालवा.

मूळ पोस्ट फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे.

लडाखच्या लेह येथील माहिती आणि जनसंपर्क विभागाने 25 सप्टेंबर रोजी व्हायरल क्लिपशी मिळताजुळता व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला होता. 

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, लेहचे अतिरिक्त उपायुक्त श्री. गुलाम मोहम्मद (जेकेएएस) आणि लेहचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री. रेग्झिन संगडुप (जेकेपीएस) यांची पत्रकार परिषद.

वरील संपूर्ण पत्रकार परिषद पाहिल्यावर लक्षात येते की, यामध्ये अधिकाऱ्यांनी असे म्हटले नाही की, अमित शहा यांनी दिलेल्या आदेशावरुन आम्ही सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचे खोटे आरोप लावत अटक केली.

या अधिकृत व्हिडिओमध्ये अतिरिक्त उपायुक्त गुलाम मोहम्मद हे 24 सप्टेंबर रोजी लेहमधील निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात जखमी आणि मृत झालेल्या लोकांबद्दल बोलत होते. तसेच स्थानिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते.

खंडन

पीआयबीने 2 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर व्हायरल दाव्याचे खंडन केले.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून न केले विधान दाखवले आहे, जेने करून लेह पोलिस अधिकांऱ्यानी भाजपला समर्थन दाखवत सोनम वांगचूक यांना अटक केली, असे दिसते.

लेहमधील आंदोलन

लेह शहरात बुधवारी सुरक्षा दल आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या संघर्षात चार जणांचा बळी गेला तर 59 जण जण जखमी झाले. या घटनेनंतर लेह जिल्ह्यात संचारबदी लागू करण्यात आली. या हिंसाचाराला सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले असून 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली लेहमध्ये अटक करण्यात आली. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मूळ व्हिडिओमध्ये लडाख पोलिसांनी लेह निषेधातील जखमी आणि मृताकांची महिती देत आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लडाख पोलिसांनी ‘अमित शाहांच्या अदेशावरुन सोनम वांगचूकांना अटक केली’ असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *