
सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियोवर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, ही घटना अमरावतीपासून बडनेरा शहरा कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर घडली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आलेला असून अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक बिबट्या रेल्वे रुळांवर धावताना आणि प्रवाशांवर झपटण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पुढे तो बिबट्या डब्याच्या दाराजवळ उभ्या असलेल्या तरुणावर हल्ला करतो, ज्यामुळे तो तरुण रुळांवर पडतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “रेल्वेच्या डब्यात उभे राहणे, किती धोक्याचे असू शकतो.? अमरावती ते बडनेरा रेल्वे मार्गावरची घटना असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम अशी कोणती घटना घडली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, माध्यमांवर अशी कोणतीही बातमी आढळत नाही.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर त्यामध्ये अनेक विसंगती आढळतात; जसे की, बिबट्याच्या पायाची हालचाल नैसर्गिक दिसत नाही. तसेच बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या लोकांचा आवाज कृत्रिम वाटतो.
व्हायरल व्हिडिओची दखल घेत वन विभागाचे अमोल गावनर यांनी स्पष्ट केले की, “हा व्हिडिओ एआय-जनरेटेड असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हिडिओमध्ये अनेक ट्रॅक दाखवले आहेत; परंतु, त्या भागात फक्त एकच ट्रॅक आहे. तसेच, वन्य प्राणी मोठ्या आवाजा ऐकून पळून जातात, त्यामुळे ते रेल्वेचा पाठलाग करत नाहीत.”
https://www.facebook.com/reel/1395330458631268
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आलेला असून अशी कोणतीही घटना घडली नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामव ट्विटरवर फॉलो करा.)
Title:बिबट्याद्वारे धावत्या ट्रेनमधून व्यक्तीला ओढून नेतानाचा व्हिडिओ खरा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered


