
काही दिवसांपूर्वी वकील अनिल मिश्रा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काळा कोट घातलेल्या एका व्यक्तीला पोलिस ओढून घेऊन जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, “वकील अनिल मिश्रा यांना पोलिसांनी अटक करण्यात आली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी अटकेलेली व्यक्ती अनिल मिश्रा नसून बिहारचे वकील सुशील कुमार चौधरी आहेत.
काय आहे दावा ?
काही पोलिस कर्मचारी एका काळा कोट घातलेल्या व्यक्तीला घेऊन जाताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अनिल मिश्रा अटक.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, डॉ. भीमराव आंबेडकरांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्यावर अनिल मिश्रा यांच्या विरुद्ध आणि समर्थनात अनेक मोर्चे निघले. परंतु, अनिल मिश्रा यांना अटक झाल्याची बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.
पुढे, रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर वैश शेख नामक इंस्टाग्राम युजरने हाच व्हिडिओ 20 जून रोजी शेअर केल्याचे आढळले.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, प्रसिद्ध ज्येष्ठ वकील अंबर इमाम हाश्मी, उर्फ ‘छोटे साहेब’ यांना ADJ-3 ने ताब्यात घेतले आहे आणि तुरुंगात पाठवले आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस कोठडीत दिसणारी व्यक्ती ‘वकील सुशील कुमार चौधरी’ आहे.”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
अंबर इमाम हाशमी यांनी 32 वर्षांपूर्वीच्या हत्याप्रकरणी सुनवाईला न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज केला होता. परंतु, त्याच दिवशी ते दुसऱ्या केससाठी त्याच कोर्टात उपस्थित होते. यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने (ADJ-3) हाशमी यांना न्यायिक तुरुंगात पाठवले.
दरम्यान सुशील कुमार चौधरी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला म्हणून त्यांनादेखील ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी अटकेलेली व्यक्ती अनिल मिश्रा नसून बिहारचे वकील सुशील कुमार चौधरी आहेत. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या अनिल मिश्रांना अटक झाली का ? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
