नुकत्याच झालेल्या पुलवामा घटनेत येथे पूर्वनियोजित आत्मघाती हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ)चे जवळपास 40 जवान मृत्युमुखी पडले. भारतीयांसाठी ही अत्यंत दुखद घटना आहे. संपूर्ण भारतात शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात येत आहे.

कथन

पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर शहीदांना विविध भागात आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथे शहीद जवानांना सामूदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण केली जात असताना, तिथे एका व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. पण काय श्रद्धांजली कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या का? याची तथ्य पडताळणी ...

अर्काइव्ह

अर्काइव्ह लिंक

तथ्य पडताळणी

यासंदर्भात जेव्हा तथ्य पडताळनी केली असता दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात याबाबतीत १५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्य झाली आहे.

Lokastta l अर्काइव्ह लिंक

पुलवामा घटनेनंतर देशभर विविध ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथील शिवाजी चौक येथे शुक्रवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी सीआरपीएफच्या जवानांना सामूदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी अचानक पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा आली.

हे वृत्त खरे आहे कि, त्यावेळी त्याठिकाणी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा आली. घोषणा देणाऱ्या व्यक्तीचे नाव कुमार उपेंद्र सिंग आहे. ही व्यक्ती मुळची बिहार मधील आहे. हा व्यक्ती मानसिक आजारी आहे. लोणावळा येथील रेल्वे विभागात टिसी या पदावर कार्यरत आहे. त्याच्या अशा विचित्र वागण्याची रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, पुढील आदेशापर्यंत त्याला निलंबित करण्यात आले आहे.

या संदर्भात इतर वृत्तपात्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Pc today l अर्काइव्ह लिंक
Mahanews l अर्काइव्ह लिंक

निष्कर्ष : लोणावळ्यात शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याच्या कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देण्यात आली हे वृत्त खरे आहे. परंतु अशी घोषणा देणारी व्यक्ति मानसिक आजाराने ग्रस्त आहे.

TrueTitle: शहीदांना श्रद्धांजली देतांना पाकिस्तान जिंदाबादची झाली घोषणा? :सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta Kale
Result: True