भारतात सरकारी रुग्णालयाची अवस्था वाईट असल्याचे मानले जाते. अनेकदा कर्मचा-यांची रुग्णांबद्दलची अनास्था आणि उपकरणांचा, योग्य सुविधांचा अभाव या बाबीही समोर आल्या आहेत. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत एक चिमुकली आपल्या हातात सलाईनची बाटली घेऊन स्टॅण्डच्या जागी वडिलांच्या शेजारी उभे राहिल्याचे दिसत आहे. नेमके या बातमीचे सत्य काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. इनसॉरट मराठी या संकेतस्थळानं याबाबतचं वृत्त प्रसारित केले आहे.

इनसॉरट मराठी | आक्राईव्ह लिंक

फेसबुकवर ही पोस्ट व्हीआयपी मराठी डॉट कॉमच्या पेजवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला 3 हजार लाईक्स आहेत. या पोस्टवर 33 कमेंटस असून 330 जणांनी ती शेअर केली आहे.

आक्राईव्ह लिंक

एक करोड हिंदूचा फेसबुक ग्रुप जो हिंदू अँड होईल त्याने 100 हिंदूंना अँड करावे या फेसबुक पेजवर मराठी न्यूजच्या नावाने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला 3 हजार 200 लाईक्स आहेत. यावर 25 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर 53 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

फेसबुकवरील पोस्टची लिंक | आक्राईव्ह लिंक

शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही या पेजवरही ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला दोन हजार 100 लाईक्स आहेत. यावर 31 प्रतिक्रिया आल्या असून 286 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

तथ्य पडताळणी

दैनिक सामनाने या घटनेचे वृत्त 9 मे 2018 रोजी दिले होते. औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात सलाईन स्टँड नसल्याने वडिलांना लावलेले सलाईन हातात उंच धरून दोन तास उभे राहण्याची कसरत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीस नुकतीच करावी लागली, असं या वृत्तात म्हटलं आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सामना | आक्राईव्ह लिंक

दैनिक नवाकाळनेही या घटनेचे वृत्त 9 मे 2018 रोजी दिले होते. या वृत्ताला घाटी रुग्णालय सलाईनवर असे शीर्षक देण्यात आले होते. या वृत्तात रुग्णालयातील कर्मचा-यांच्या बेजबाबदारपणामुळे असे घडल्याचे म्हटले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दैनिक नवाकाळ | आक्राईव्ह लिंक

शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही या फेसबुक पेजवरील या बातमीच्या पोस्टवर अभिजित विठ्ठलराव रावधानोरकर यांनी प्रतिक्रिया देताना हा फोटो काढणा-याने माफी मागितली आहे. परेश ठाकरे यांनीही फोटोग्राफरने हा फोटो मुद्दाम अशा पध्दतीने काढला असल्याचे व त्याबद्दल माफी माफी मागितल्याचे बरोबर असल्याचे म्हटले आहे.

दैनिक दिव्य मराठीने घाटीतील ते दृश्य बनावटच; फोटो काढणा-याने दिली कबुली या शीर्षकाने या घटनेचे वृत्त 11 मे 2018 रोजी पडताळणी करुन दिले आहे. यात या मुलीनेच फोटो काढण्यासाठीच आपल्याला सलाईनची बाटली हातात धरायला सांगितले होते, असे म्हटले आहे. या घटनेची पडताळणी करत सविस्तर वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दैनिक दिव्य मराठी | आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

फोटो खरा असला तरी तो हा प्रसंग रचून काढलेला आहे. या मुलीच्या वडिलांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार घेतले हे सत्य आहे. वडिलांना वाचविण्यासाठी चिमुकली स्टॅण्डच्या जागी उभी राहिल्याचे आमच्या पडताळणीत असत्य आढळलं आहे.

MisleadingTitle: वडील वाचावे यासाठी अनेक तास हातात सलाईन पकडून उभी राहिली मुलगी काय आहे नेमकं सत्य
Fact Check By: Dattatray Gholap
Result: False (असत्य)