रतन टाटा यांनी सहा वर्षांपूर्वी नाकारलेला दावा मीडियावर पुन्हा एकदा फिरत आहे. या फसवणूकीची वर्तमान आवृत्ती जातीय प्रवृत्ती पेटविण्याचा आणि पारसी समाजाच्या देशभक्तीच्या मूल्यांची तुलना मुस्लिमांसोबत करण्याचा प्रयत्न करत आहे.

मॅसेज असा दावा करतो कि यूपीएमधील माजी वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी पाकिस्तानी उद्योजकांच्या प्रस्तावाला विचारात घेऊन विनंती केल्यानंतर सुद्धा रतन टाटा यांनी टाटा सुमो कार विक्री करण्यास नकार दिला.

मॅसेज.“”तुम्ही निर्लज्ज होऊ शकता, मी नाही” ~ रतन टाटा. 26/11 नंतर काही महिन्यांत टाटा ग्रुपच्या मालकीच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स ने भारतातील आणि परदेशातील सर्व हॉटेल्स पुनर्निर्मित करण्यासाठी त्यांचे सर्वात मोठे टेंडर सुरू केले. काही पाकिस्तानी कंपन्यांनीसुद्धा त्या टेंडरसाठी अर्ज केला. त्यांची बोली आणखी मजबूत करण्यासाठी, पाकिस्तानचे दोन मोठ्या उद्योजक मुंबईतील बॉम्बे हाऊस (टाटाचे मुख्य कार्यालय) मध्ये रतन टाटा यांना अपॉइंटमेंटशिवाय भेटण्यासाठी आले, कारण त्यांनी आधी त्यांना अपॉइंटमेंट दिली नव्हती. त्यांना बॉम्बे हाउस च्या रिसेप्शन वर प्रतीक्षा करण्याचे सांगण्यात आले आणि काही तासानंतर एक मॅसेस देण्यात आला कि, रतन टाटा व्यस्त आहेत आणि आधी घेतलेल्या अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटू शकत नाहीत. निराश होऊन हे दोन्ही पाकिस्तानी उद्योजक दिल्लीला गेले आणि त्यांच्या उच्चायोगाने एका कॉंग्रेस मंत्र्याची भेट घेतली. त्यानंतर हे मंत्री आनंद शर्मा तत्काळ रतन टाटा सोबत बोलले आणि या दोन पाकिस्तानी उद्योजकांना भेटण्यासाठी आणि "निस्वार्थीपणे" त्यांच्या टेंडरचा विचार करण्याची विनंती केली.

रतन टाटा यांनी.. "तुम्ही निर्लज्ज होऊ शकता, मी नाही" असे उत्तर दिले आणि फोन ठेवला. काही महिन्यांनंतर जेव्हा पाकिस्तानी सरकारने टाटा सुमो पाकिस्तानमध्ये आयात करण्यासाठी ऑर्डर दिली तेव्हा रतन टाटा यांनी त्या देशाला एक वाहन देण्यास सुद्धा नकार दिला. त्यांच्या मातृभूमीबद्दल हा त्यांचा सन्मान आणि प्रेम आहे. त्यांनी त्यांच्या देशाला पैसा आणि व्यवसायापेक्षा वर ठेवले आहे. केजरीवाल आणि त्यांच्यासारखे काही त्यांच्याकडून शिकू शकतात, जे बहुतांश वेळा त्यांच्या पाकिस्तानी मास्टर्सला आनंदी ठेवण्यासाठी अतिरेक्यांना आणि अलगाववाद्याना खुश ठेवतात. विसरू नका, रतन टाटा पारशी पार्श्वभूमीतील एक माणूस आहे जे कि भारतीय उपखंडामधील दोन झोरोस्ट्रियन समुदायांपैकी एक आहे. त्यांचा समाज भारतामध्ये खूप कमी आहे परंतु त्यांच्यापैकी प्रत्येकाने भारताला अभिमान दिला आहे. जिथे टाटा परिवार देशभक्तीने भरलेला आहे, तेथे आपल्याकडे तथाकथित अल्पसंख्याक आहेत जे एकतर फ्रीबीज मागण्यात किंवा पाकिस्तानला बॉंब लावण्यास मदत करण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि जेव्हा ते पकडले जातात तेव्हा ते नकळत बळी पडतात आणि दहशतवादी म्हणून शहीद होतात. शेअर करा जेणेकरून ते भारतात राहणाऱ्या आणि पाकिस्तानात त्यांच्या हँडलर्ससाठी देखरेखीचे काम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचतील.

सध्या, या मॅसेज च्या विविध आवृत्त्या अनेक फेसबुक पेज आणि अकाउंटद्वारे शेअर केल्या जात आहेत.

आणखी एक आहे:

“टाटा समुह ग्रँड खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुपने पाकिस्तान सरकारचा बहु-कोटीचा प्रस्ताव नाकारला.

"भारताविरूद्ध दहशतवादी कारवाया सुरू करणाऱ्या देशांसोबत कोणताही व्यवसाय होणार नाही." असे बोलून टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी या प्रस्तावाला नकार दिला

या देशभक्तीच्या भावनेसाठी रतन टाटा यांना भव्य सलाम.

दुर्दैवाने भारतामध्ये त्यांच्यासारखे खूप कमी लोक राहिले आहेत जे आर्थिक लाभांपेक्षा राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेला महत्त्व देतात.

आम्ही तुम्हाला सलाम करतो!”

या मॅसेज चा वास्तविक उगम अज्ञात आहे, परंतु 8 ऑगस्ट 2012 रोजी भारत ऑटोज वेबसाइट वरील लेखामध्ये हे प्रकाशित करण्यात आले होते ज्यामध्ये बोलल्या गेले होते कि पाकिस्तान पोलीस च्या वापरासाठी पाकिस्तान ला टाटा ग्रुप कडून टाटा सुमो ग्रँड खरेदी करायची आहे. हा लेख पोस्ट झाल्यानंतर, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आणि विविध संरक्षण आणि ऑटोमोटिव्ह फोरम वर मॅसेज पसरण्यास सुरुवात झाली. तथापि, मॅसेज एक सत्य घटना नाही. 'तुम्ही निर्लज्ज होऊ शकता.... मी नाही : टाटा चे पाकिस्तान ला उत्तर' अशा शीर्षकाचा युट्युब व्हिडीओ 15 जुलै, 2016 रोजी प्रकाशित झाला ज्याला 6 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि 10000 'लाईक्स' मिळाले आहेत. हे मागील सहा वर्षापासून प्रसारित झालेली तीच गोष्ट सांगत आहे.

आम्हाला टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटवर या विषयावरील कोणतीही प्रेस रिलिझ सापडली नाही. तथापि, 16 जुलै, 2013 रोजी टाटा मोटर्सच्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले गेले कि तो दावा चुकीचा आहे.

आणि टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याकडून या न्यूजविषयी अधिकृत प्रतिक्रिया खाली दिलेली आहे:

“न्यूज चुकीची आहे - कंपनीला अशी कोणतीही ऑर्डर मिळाली नाही आणि भारत व पाकिस्तान यांच्यातील व्यापार, ऑटोमोबाइल प्रतिबंधित यादीमध्ये आहेत. त्यामुळे, पाकिस्तान ने टाटा मोटर्सकडे ऑटोमोबाइलसाठी कोणतीही ऑर्डर केली हा प्रश्नच उद्भवत नाही .

https://twitter.com/TheMayanks/status/356387770769485825

@RNTata2000 नमस्ते सर, मी कुठेतरी वाचले आहे की तुम्ही खूप आधीपासून पाकिस्तानला टाटा सुमो पुरवण्यासाठी नकार दिला आहे, हे खरे आहे का?

https://twitter.com/TataMotors/status/357009524705595392

@RNTata2000नमस्ते सर, मी कुठेतरी वाचले आहे की तुम्ही खूप आधीपासून पाकिस्तानला टाटा सुमो पुरवण्यासाठी नकार दिला आहे, हे खरे आहे का?

https://twitter.com/TataMotors/status/357009650656350208

@ दमयंक्स  त्यामुळे, पाकिस्तान ने टाटा मोटर्सकडे ऑटोमोबाइलसाठी कोणतीही ऑर्डर केली याचा प्रश्नच उद्भवत नाही. 2/2

म्हणून हा मॅसेज फसवा आहे आणि शेअर करण्याची गरज नाही. असे मॅसेज मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये दीर्घकाळापासून प्रसारित होत आहेत आणि नियमित काळानंतर प्रसारित होत आहेत जे थांबविण्याची गरज आहे. आणि हे फक्त तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण जागरूक होऊ आणि असे मॅसेज पाठवणे बंद करू जे आपल्या प्रत्येक गोष्टी समजून खात्री करण्याच्या प्रवृत्ती ला भडकावतो आणि उत्तेजित करतो