एखादी सवय लावण्याच्या बाबतीत आपला मेंदू 21 दिवस घेतो, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेला आहे. एखादी सवय मोडायची असेल तरी हाच नियम लागू पडतो. हा नियम माहिती नसल्याने अनेकांचे खूप नुकसान होत असते. koshtee.com या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ही बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

koshtee.com | आक्राईव्ह लिंक

फेसबुकवरील आमचं काही चुकलं का? या पेजवर या बातमीला 577 लाईक्स आहेत. ही बातमी 240 जणांनी शेअर केली आहे.

तथ्य पडताळणी

एखादी सवय लावण्याच्या बाबतीत आपला मेंदू 21 दिवस घेतो, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेला आहे, असा दावा वेळ व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणा-या कांचन दीक्षित यांनी केला आहे. आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी हा दावा केला आहे.

आम्ही याबाबत पुण्यातील सुप्रसिध्द मानसोपचार आणि ताणतणाव नियोजन तज्ञ डॉ. विद्याधर बापट यांच्याशी संपर्क साधला. डॉ. विद्याधर बापट म्हणाले की, सर्वसाधारणपणे असा नियम सांगण्यात येत असला तरी तसे 100 टक्के म्हणता येत नाही. प्रत्येक व्यक्तीची मानसिक क्षमता आणि स्थिती भिन्न असतो. त्याची कशी मानसिक जडण-घडण झाली. तो कोणत्या परिस्थितीतून आला. त्याप्रमाणे हे कमी अधिक होऊ शकते.

निष्कर्ष

एखादी सवय लावण्याच्या बाबतीत आपला मेंदू 21 दिवस घेतो ही बाब सत्य असली तरी ते प्रत्येकाच्या बाबतच लागू होत नाही. व्यक्तीच्या मानसिक स्थितीवरही ही बाब अवलंबून असते त्यामुळे ही बाब अर्धसत्य असल्याचे फॅक्ट क्रिसेडोच्या तथ्य पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Avatar

Title:मेंदूला एखादी सवय लागण्यास लागतात 21 दिवस, सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap

Result: Mixture