
Xiaomi Redmi Note 7 हा सध्याचा भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्मार्टफोन आहे. शाओमीचा हा फोन गेल्याच महिन्यात बाजारात आला आहे. आता शाओमी हा फोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनसह कंपनी आपला सब ब्रँड असलेल्या रेडमीला वेगळ्या ब्रँडच्या रुपात सादर करत आहे. रेडमी नोट 7 हा फोन अशा स्वतंत्र ब्रँडखाली लोकप्रिय होईल असा कंपनीला विश्वास आहे.
ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्र टाईम्स
आक्राईव्ह पोस्ट
फेसबुकवर या बातमीला 4 हजार 200 लाईक्स आहेत. या बातमीवर 36 जणांनी कमेंट केली आहे. ही बातमी 134 जणांनी शेअर केली आहे.
तथ्य पडताळणी
एनडीटीव्हीच्या गॅजेट 360 या संकेतस्थळानं Redmi Note 7 ची किंमत 10,300 रुपये असण्याची शक्यता वर्तवली आहे. 64 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या Redmi Note 7 ची किंमत 12,400 रुपये दर्शविण्यात आली आहे. Xiaomi Redmi Note 7 प्रीमियमची किंमत 14,500 रुपये दर्शवण्यात आली आहे.
ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गॅजेट 360
आक्राईव्ह पोस्ट
शाँप ऑन या संकेतस्थळानं या Redmi Note 7 ची किंमत 10,300 रुपये दर्शवली आहे. या संकेतस्थळावर ईएमआयचा ऑप्शनही उपलब्ध आहे. त्याद्वारे Redmi Note 7 ची किंमत आणखीनच वाढते.
खालील लिंकवर ही माहिती सविस्तर पाहू शकता.
ईनाडू इंडिया मराठीने Redmi Note 7 ची किंमत 14,500 रुपये दर्शवली आहे. Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी याबाबतची माहिती ईनाडू मराठीला दिलेली आहे. जैन यांनी जून महिन्यात एक फोटोही फेसबूकवर शेअर केला होता. तो ही आपल्या या बातमीत दिसत आहे.
ही बातमी आपल्याला खालील लिंकवर सविस्तर वाचता येईल.
ईनाडू इंडिया मराठी
आक्राईव्ह पोस्ट
निष्कर्ष
महाराष्ट्र टाईम्सनं आपल्या बातमीच्या शीषर्कात रेडमी नोट 7 ची किंमत 9,999 असल्याचं म्हटलंय. प्रत्यक्षात आम्ही विविध संकेतस्थळावर रेडमी नोट 7 ची किंमत जाणून घेतली असता ती 10,300 रुपये असल्याचे दिसत आहे. ईनाडूनं याची किंमत 14,500 रुपये दर्शवली आहे.
शॉप ऑनच्या संकेतस्थळावर Mobikwik चा वापर केल्यास 300 रुपये कॅशबॅक देण्यात येत आहे.

पण Mobikwik चा वापर केला तरी याची किंमत दहा हजार रुपये होते. म्हणजेच ही किंमत 9999 एवढी होत नाही. याचाच अर्थ बातमीत देण्यात आलेली माहिती सत्य असली तरी शीर्षक चुकीचं आहे.
![]() |
Title: तथ्य पडताळणी : Redmi Note 7 येतोय; किंमत ९,९९९ रुपये Fact Check By: Dattatray Gholap Result: False Headline (शीर्षक चुकीचं आहे.) |
