परिचय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. पण सध्या योगी आदित्यनाथ यांच्या भावाबद्दलचा एक फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती चहा बनवत असून, त्या फोटोखाली “ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ आहेत.” असे लिहून येत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर होणारी चर्चा खालील प्रमाणे आहे.

http://archive.li/XY1ud

सोशल मिडियावरील प्रचलित कथन

आरकाईवड लिंक

२०१७ मध्ये अशाच प्रकारची अफवा पसरली होती. त्याबदलची माहिती खालीलप्रमाणे आहे.

https://twitter.com/thebakwaashour/status/897384755980902400

तथ्य पडताळणी

पूर्वी उत्तर प्रदेशात असणारे, पण (आता उत्तराखंड) असलेले यमकेश्वर तहसील अंतर्गत पंचूर गावातील गढवाली राजपूत परिवारात योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव आनंद सिंह असे आहे. ते, त्या परिसरातील निवृत्त वनरक्षक आहेत. योगींच्या आईचे नाव सावित्रीदेवी आहे. आनंद सिंह यांना एकूण सात अपत्य आहेत. त्यापैकी योगी आदित्यनाथ हे त्यांचे पाचवे अपत्य आहे. योगी आदित्यनाथ यांना तीन मोठ्या बहिणी असून, एक मोठा भाऊ आहे, तर दोन छोटे भाऊ आहेत. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या परिवाराची भेट घेत, एबीपी वृत्तसंस्थेने एक खास रिपोर्ट केला आहे. या रिपोर्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या आई-वडिलांशी आणि त्यांच्या दोन भावांसोबत एबिपीच्या पत्रकाराने बातचीत केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=rvbRUYzGYfU

योगी आदित्यनाथ यांच्या मोठ्या भावाचे नाव मानवेंद्र मोहन सिंह, तसेच दोन छोट्या भावांमध्ये एका भावाचे नाव महेंद्र सिंह बिष्ट आहे, तर दुसऱ्या भावाचे नाव शैलेन्द्र मोहन बिष्ट असे आहे. मानवेंद्र मोहन सिंह, महेंद्र सिंह बिष्ट हे दोघेही योगींचे जन्मस्थान असणारे पंचूर गावातच राहतात. योगींचा लहान भाऊ शैलेंद्र मोहन बिष्ट हे भारतीय सेनेत सुबेदार पदावर काम करतात.

दरम्यान सोशल मिडीयावर वायरल होणारा ‘तो’ फोटो २०१७ मध्ये पोस्ट झाला असून, त्या फोटोच्या कम्मेन्ट्स विभागात राहुल गुरंग या युवकाने फोटोमधील व्यक्ती इम्फाळ मध्ये राहतो असे लिहिले आहे.

निष्कर्ष :
सोशल मिडीयावर वायरल होणाऱ्या फोटोतील व्यक्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भाऊ नसून, त्या व्यक्तीचा योगी अथवा योगींच्या परावारातील कोणाशीही कोणताच संबंध नाहीये. त्यामुळे हा फोटो खोटा आहे.

FalseTitle: काय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा भाऊ चहा विक्रेता आहे? "
Fact Check By: Amruta kale
Result: False