सध्या संभाजीनगरमध्ये बिबट्याच्या वावर असल्याने शहरामध्ये भिती निर्माण झाली आहे. अशा वेळी अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक बिबट्या वावरताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या बीड बाय पास रोडवरील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा नसून कर्नाटकचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर बिबट्या बसलेला दिसतो. “बिबट्याला पाहून अनेक वाहने माघारी फिरतात.”

युजर्स बिबट्याचा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील बीड बाय पास रोडवरचा नाही.

टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार हा व्हिडिओ कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील बिनकडकट्टी गावातील आहे.

16 एप्रिल 2023 रोजी रात्री तेथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 67 वर बिबट्या ठाण मांडून बसला होता. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. ही क्लिप समोर आल्यानंतर स्थानिक प्राणीसंग्रहालयातून हा बिबट्या पळून आल्याची अफवा पसरली होती.

बिनकडकट्टी येथील उप वनसंरक्षक दीपिका बाजपेयी यांनी या अफवेचे खंडन करताना सांगितले की, “गडग प्राणीसंग्रहालयातून कोणताही बिबट्या पळून गेलेला नाही. ही निव्वळ अफवा आहे. बिनकडकट्टी रोडवर दिसलेला बिबट्या आसपासच्या वनक्षेत्रातून आलेला असावा.”

फॅक्ट क्रेसेंडोने दीपिका बाजपेयी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमधील बिबट्या कर्नाटकच्या गडग जिल्ह्यातील एका गावात आढळला होता. आम्ही प्राणीसंग्रहालय आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. बिबट्या जंगलाच्या दिशेने गेला आहे.”

सदरील माहितीच्या आधारे गुगल मॅप्सवर शोध घेतल्यावर व्हिडिओ क्लिपमधील जागा सापडली. ती आपण इथे पाहू शकतात.

खाली दिलेली तुलना पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ आणि मॅपमधील दोन्ही रस्ते एकच आहेत.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की,व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या बीड बाय पास मार्गावरील नसून तो बिबट्या कर्नाटकमध्ये आढळला होता. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटकातील बिबट्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या नावाने व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading