या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत; वाचा सत्य
सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा हा फोटो आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबतची व्यक्ती गजाजन महाराज नसून ते पुरीच्या शंकराचार्य आहेत.
काय आहे दावा?
पोस्टमध्ये शेयर केलेल्या फोटोत तीन व्यक्ती दिसतात. सुभाषचंद्र बोस (डावीकडून पहिले) काही तरी लिहित आहेत, तर त्यांच्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे. तिसरा व्यक्ती बसलेला असून ते गजानन महाराज असल्याचे गृहित धरले जाते.
कॅप्शनमध्ये लिहिले की, श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो. हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांच्या घरी काढला आहे. अजूनही त्याची निगेटिव्ह त्यांनी जपून ठेवली आहे. गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा.
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोला गुगल आणि यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अनेक रिझल्ट समोर येतात. पैकी Rare & Historical नावाच्या एका ट्विटर अकाउंटवर 5 एप्रिल 2016 रोजी अपलोड केलेल्या फोटोच्या कॅप्शननुसार हा फोटो सुभाषचंद्र बोस आणि पुरीचे शंकाराचार्य यांच्या भेटीचा आहे. ते मूळ ट्विट तुम्ही येथे पाहू शकता. त्याचे अर्काइव्ह येथे पाहा.
हा धागा पकडून गुगलवर सर्च केले असता काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलचे एक ट्विट आढळले. 21 जानेवारी 2017 रोजी केलेल्या या ट्विटनुसारसुद्धा या फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पुरीचे शंकराचार्य दिसत आहेत.
https://twitter.com/incindia/status/823055095189438464%E2%80%8F
विशेष म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी समाधी घेतली होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. म्हणजे गजानन महाराजांनी समाधी घेतली तेव्हा नेताजी केवळ 13 वर्षांचे होते.
फोटोमध्ये मात्र नेताजी प्रौढ दिसतात. यावरूनही हा फोटो गजानन महाराजांसोबतचा असणे शक्य नाही. फोटोत खुर्चीवर बसलेले व्यक्ती पुरीचे शंकराचार्य आहेत.
मग ती उभा असलेला व्यक्ती कोण आहे?
बेटर इंडिया आणि इंडियन हिस्ट्री ट्विटर अकाउंटवरील माहितीनुसार, ही उभा असलेली व्यक्ती नेताजींचा ड्राईव्हर/अंगरक्षक “कर्नल” निजामुद्दीन आहे. नेताजींचा अत्यंत विश्वासू असलेल्या निजामुद्दीन यांनी सुभाषबाबूंचा जीव वाचविण्यासाठी स्वतः तीन गोळ्या अंगावर घेतल्या होत्या. नेतीजींनीच त्यांना कर्नल ही उपाधी दिली होती. त्यांचे 6 फेब्रुवारी 2017 रोजी वयाच्या 117 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याविषयी अधिक येथे वाचा – बेटर इंडिया । अर्काइव्ह
https://twitter.com/indianhistory00/status/828540873742774272
फोटो कधी आणि कोणी काढला?
बेटर फोटोग्राफी आणि रेडिटवरील माहितीनुसार हा फोटो मनोरंजन घोष नावाच्या छायाचित्रकाराने 1940 मध्ये काढला होता. स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दुर्लक्षित छायाचित्रकार असेच मनोरंजन घोष यांचे वर्णन करावे लागेल.
पाटणा येथे 1909 मध्ये जन्मलेल्या मनोरंजन यांना लहापणापासूनच कलेमध्ये रुची होती. फोटोग्राफीसोबतच ते चित्रकलेतही माहीर होते. त्यांच्याविषयी अधिक खाली दिलेल्या लिंकवर वाचा.
टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह । बेटर फोटोग्राफी । अर्काइव्ह
थोडक्यात या फोटोची माहिती अशी:
निष्कर्ष
पोस्टमध्ये दिलेला फोटो गजानन महाराजांसोबतचा नसून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पुरीच्या शंकराचार्य यांच्या भेटीचा आहे. हा फोटो 1940 साली मनोरंजन घोष यांनी काढला होता. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत; वाचा सत्य
Written By: Agastya Deokar
Result: False