व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नाहीत; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

स्वामी विवेकानंद यांचा दुर्मिळ व्हिडिओ म्हणून एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नसून ते स्वामी योगानंद आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

या अकरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लांब केस, डोक्यावर पगडी परिधान केलेली एक व्यक्ती काही परदेशी लोकांसोबत रस्त्यावर चालताना दिसते.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की,स्वामी विवेकानंद यांना प्रत्यक्षात पाहिलं नाही पण त्यांचा हा एक व्हिडिओ पहा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये लक्षपुर्वक पाहिल्यावर “[email protected]” हा ईमेल एड्रेस दिसतो.

हा धागा पकडून अधिक माहिती मिळवल्यावर कळाले की, दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वेबसाईटवर मुविंग इमेज रिसर्च कलेक्शन्समध्ये (MIRC) ही व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे. ती आपण इथे पाहू शकतात.

आर्काइव्ह

वेबसाईटवरील माहितीनुसार ते स्वामी योगानंद आहे. 1923 मध्ये स्वामी योगानंद आणि त्यांचे सहकारी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरतानाचा हा व्हिडिओ आहे.

पुढे अधिक महिती मिळवल्यावर स्वामी योगानंद यांच्या सेल्फ रियलाइजेशन 

फेलोशिप या वेबसाईटवर त्यांचे व्हायरल व्हिडिओ क्लिपमधील एक फोटे आढळला.

या फोटोसोबत लिहिलेले आहे की, 1923 मध्ये परमहंस योगानंद म्हणजेच स्वामी योगानंद यांचा हा फोटो न्यूयॉर्क सिटीमध्ये काढण्यात आला होता.

स्वामी योगानंद

स्वामी योगानंद (परमहंस योगानंद) हे एक योग गुरू होते. ज्यांनी आपल्या सेल्फ रियलाइजेशन फेलोशिप आणि सत्संग सोसाइटी ऑफ इंडिया या संस्थांच्या माध्यमातून लोकांना योग आणि साधनेची ओळख करून दिली.

खालील तुलनात्मक फोटो लक्षपूर्वक पाहिल्यावर लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ क्लिपमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नसून ते स्वामी योगानंद आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ क्लिपमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नसून ते स्वामी योगानंद आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading