
शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला झालेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
गर्दीचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करून म्हटले जात आहे की, सौदी अरेबियामध्ये पठाण सिनेमा पाहण्यासाठी लोकांची अशी झुंबड उडाली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कतारमध्ये झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यानचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक एका मॉलमध्ये प्रवेश करत आहेत. ‘महाराष्ट टाइम्स’ व ‘डिजिटल प्रभात’ने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “पठाण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची सौदीत तुफान गर्दी.”
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड्स सर्च केले असता कळाले की, व्हायरल व्हिडिओ सौदी अरेबियातील नाही.
फिफा विश्वचषकच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबर 2022 रोजी कतारच्या मेट्रो स्टेशनवर मोठ्यासंख्येने लोक जमा होते. खाली दिलेल्या मूळ टिकटॉक व्हिडिओमध्ये प्रवेश द्वाराजवळ आणि एस्केलेटरवर अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये आम्ही अनेक अर्जेंटिनियन चाहते आपण पाहू शकतो.
Archive
मुळ पोस्ट – टिकटॉक | आर्काइव्ह
पुढे मेट्रो स्टेशनच्या खिडकीतून दिसणारे डिझाइन, साइनबोर्ड आणि स्टेडियमचे दृश्य हे ‘लुसेल मेट्रो स्टेशनचे’ असल्याचे कळाले.

मूळ पोस्ट – गुगल मॅप
फिफा विश्वचषकच्या शेवटच्या दिवशी मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी असल्याने लोकांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागली होती.
लुसेल मेट्रो स्टेशनवर शेवटच्या दिवशी झालेली गर्दी आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सौदीमधील पठाण चित्रपट बघण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचा नव्हता. कतारमधील फिफा विश्वचषकादरम्यान ‘लुसेल मेट्रो स्टेशनमध्ये’ झालेल्या गर्दीचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Title:दुबईमध्ये पठाण चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीचा हा व्हिडिओ नाही, वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
