उत्तर प्रदेशच्या चांदौली शहरात एका दुकानातून 300 हून अधिक ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक स्थानिकांसमोर इव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. 2019 मध्ये उत्तर प्रदेश चांदौली स्ट्राँग रूम मधून सरकारी कर्मचारी मतदान न झालेली (रिकामे) इव्हीएम मशीन शिफ्ट करत होते.

काय आहे दावा ?

या व्हायरल क्लिपमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती हातात दोन इव्हीएम घेऊन जाताना आणि स्थानिक त्याचा व्हिडिओ काढताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ठिकाण - चंदौली, उत्तर प्रदेश, स्थानिक लोकांनी दुकानात ठेवलेले 300 हून अधिक ईव्हीएम मशीन पकडल्या.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंदौलीचे जिल्हाधिकारी निखिल टिकाराम फंडे यांनी क्लिपची दखल घेतली.

जिल्हाधिकारी निखिल फंडे यांनी सर्व प्रथम स्पष्ट केले की, "अशी कोणतीही घटना घडल्याचे आढळून आले नाही. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येत आहे. अंतिम अपडेट लवकरच देण्यात येईल."

https://twitter.com/dmchandauli/status/1752022437192151110?s=20

चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते सांगतात की, “हा व्हिडिओ 2019 सालच्या लोकसभा निवडणुकदरम्यानचा आहे. त्यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हीव्हीपीएटी (वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) हलवण्यात आले होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनियमितता (बेकायदेशीर) नव्हती.”

https://twitter.com/dmchandauli/status/1752030583272964552?s=20

याशिवाय चंदौली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा असून खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अकाउंटवर कारवाई केली जाईल.”

मूळ पोस्ट – ट्विटर

चांदौली मतदान केंद्र 2019

ईव्हीएमने भरलेले वाहन चंदौली येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचल्याने गोंधळ निर्माण झाला होता. समाजवादी पार्टी आमदाराच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी मालवाहू वाहन थांबवून चालकाला ओलीस धरले आणि भाजपवर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. संपुर्ण बातमी येथे वाचू शकता.

या घटनेनंतर निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यानेही एक पत्र शेअर केले, ज्यामध्ये स्पष्ट केले होते की, चंदौलीमध्ये 20-5-2019 रोजी मतदान पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी या इव्हीएम मशीन तहसील सकलडिहा येथील तात्पुरत्या स्ट्राँग रूममधून नवीन कृषी उत्पादनाच्या अतिरिक्त वाटप केलेल्या स्ट्राँग रूम क्रमांक-9 मध्ये पाठवण्यात आल्या होत्या. तसेच या कक्ष क्रमांकामधील वापरात नसलेल्या मशिनची माहिती यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली होती. या ठिकाणी कुठेही अनियमित प्रकार (बेकायदेशीर) घडला नव्हता.

तसेच समाजवादी पक्षाचे जिल्हा प्रमुख सत्यनारायण राजभर यांनी पक्षाच्या वतीने सांगितले की, “ईव्हीएम संदर्भात अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलांवर ते समाधानी आहेत.”

दोन्ही पत्र आपण खालील ट्विटमध्ये पाहू शकतात.

https://twitter.com/SpokespersonECI/status/1130719857735917568?s=20

झाशीचे तत्कालीन जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) यांनी ईव्हीएमच्या चुकीच्या हाताळणीच्या दाव्याचे खंडण केले.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये इव्हीएम जप्त केले जात नव्हते. उत्तर प्रदेशमध्ये 2019 सालच्या लोकसभा निवडणूका संपन्न झाल्यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती चांदौली स्ट्राँग रूम मधून सरकारी कर्मचारी मतदान न झालेली रिकामे इव्हीएम मशीन शिफ्ट करत होते.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चांदौली उत्तर प्रदेशमध्ये खरंच 300 ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading