नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामगारांसोबत जेवण करतानाचा एक व्हायरल होत आहे. या फोटोसह दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांसोबत जेवण केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो राम मंदिराशी संबंधित नाही. हा फोटो दोन वर्षांपूर्वी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घघाटनादरम्यानचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये नरेंद्र मोदी कामगारांसोबत जेवण करताना दिसतात.

हा फोटो शेअर करताना युजर्स लिहातात की, “ताजमहाल बांधणाऱ्या मंजुराचे हात तोडले होते राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांबरोबर जेवण हे आहे संस्कार आणि हिंदूत्व.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटोमध्ये विश्वनाथ धाम आणि विश्वनाथ मंदिर न्यास असे लिहिलेले दिसते.

हा धागा पकडून कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या उद्घाघाटनाचा आहे.

एबीपी न्यूजच्या बातमीनुसार, नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यासाठी 13 डिसेंबर 2021 रोजी वाराणसीला गेले होते. उद्घाटनानंतर या प्रकल्पावर काम करणाऱ्या सुमारे 2500 मजुरांसोबत त्यांनी दुपारचे जेवण केले होते.

मूळ पोस्ट – एबीपी गंगा

एएनआयने या सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामात सहभागी कामगारांसोबत जेवण केले.”

https://twitter.com/ANINewsUP/status/1470329931745751040?s=20

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो राम मंदिराशी संबंधित नाही. 2021 मध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेवण केले होते. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंतप्रधान राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत जेवण करतानाचा हा फोटो नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False