पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून त्यांना कपाळावर मध्याभागी दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडली.

याच पार्श्वभूमी ममता बॅनर्जींच्या कपाळावर डावीबाजुला बँडएड लावलेला फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, जखम मध्यभागी आणि पट्टी डावीकडे लावल्याने ममता बॅनर्जींचा खोटारडेपणा समोर आला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळते की, ममता बॅनर्जींना मलमपट्टी केल्याचा फोटो सध्याचा नसून 3 महिन्यापूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये एका फोटोमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम दाखवली आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या कपाळावर डाव्याबाजूला बँडएड दिसते.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल पोस्टमधील ममता बॅनर्जींना बँडएडचा फोटो जानेवारी महिन्यातीला आहे.

लोकमत टाइम्सने हाच फोटो आपल्या वेबसाईटवर 24 जानेवारी रोजी अपलोड केला होता. सोबत दिलेल्या महितीनुसार “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना 24 जानेवारी रोजी कार अपघामध्ये किरकोळ जखमी झाल्या.”

ममता बॅनर्जींनी उपचारानंतर माध्यमांशी संवाद साधताना खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

https://youtu.be/KF6KVFViQT0?si=Htltxmxz2lnlvQGv

सध्या केलेली मलमपट्टी

इंडिया टूडेच्या बातमीनुसार ममता बॅनर्जी यांना 14 मार्च रोजी त्यांच्या घराच्या परिसरात पडून जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कपाळाला दुखापत झाल्याने त्यांना सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खालील स्क्रीनशॉटमध्ये आपण ममता बॅनर्जींच्या डोक्याला केलेली मलमपट्टी पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या डाव्याबाजूला बँडएड लावलेला फोटो सध्याचा नाही. भ्रामक दाव्यासह 3 महिन्यापूर्वीचा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ममता बॅनर्जींनी कपाळावर जखम झाल्याचे नाटक केले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False