
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केल्याची आणि जीएसटीचा निर्णय योग्य नव्हता, असे मत अरुण जेटली यांनी व्यक्त केल्याची पोस्ट Umar N. Panhalkar यांनी Im With Congress या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोटबंदीवर काय वक्तव्य केले आहे, याचा आम्ही शोध केला. त्यावेळी आम्हाला बिझनेस स्टॅन्डर्ड या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार दिग्विजय सिंग यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की, सरकारने नोटबंदीचा लघु आणि मध्यम उद्योगावर तसेच रोजगारावर काय परिणाम झाला याचा कोणताही अभ्यास केलेला नाही. हे वृत्त आपण खाली सविस्तरपणे वाचू शकता.
आपण खाली निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत दिग्विजय सिंग यांच्या प्रश्नावर नेमके काय उत्तर दिले ते पाहू शकता.
याशिवाय आनंद शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नाला निर्मला सीतारमण यांनी काय उत्तर दिले तेही आपण खाली पाहू शकता.
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 2 जुलै 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोटबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मत व्यक्त केले आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असे म्हटले आहे.
एनडीटीव्हीनेही हे वृत्त दिले होते. त्यावर निर्मला सीतारमण यांनी आक्षेप घेतला
एनडीटीव्हीने त्यावर उत्तर देत हे वृत्त पीटीआयकडून आल्याचे व त्यात योग्य ते बदल केल्याचे सांगितले. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.
जीएसटीचा निर्णय अयोग्य होता, असे मत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे का, याचाही आम्ही शोध घेतला. त्यावेळी सिंगल टॅक्स स्लॅबसोबत जीएसटीचा दर घटविण्याबाबत जेटली यांनी सरकारला इशारा दिला असल्याचे वृत्त आम्हाला दिसून आले. जेटली यांनी ब्लॉग लिहून सरकारला याबाबतचा इशारा दिला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमर उजालाने एक जुलै 2019 रोजी हे वृत्त दिले आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी : अमर उजाला
फायनॅशल एक्स्प्रेसने एक जुलै 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार भारतात एक दर, एक जीएसटी अशी व्यवस्था लागू होऊ शकत नसल्याचे मत जेटली यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी : फायनॅशल एक्स्प्रेस / Archive
निष्कर्ष
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केलेले नाही. जीएसटीचा निर्णय योग्य नव्हता, असे मत अरुण जेटली यांनी व्यक्त केलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे.

Title:Fact Check : निर्मला सीतारमण म्हणाल्या का, नोटबंदीचा निर्णय चुकीचा
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
