धीरेंद्र शास्त्री यांनी मिठी मारलेली ही महिला कोण होती? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य

False Social

बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिल्यानंतर सध्या ते खूप चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बागेश्वर बाबा एका महिलेला मिठी मारत आहेत, असा नेटकरी दावा करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एक वर्षांपूर्वीचा आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे महिलेला मिठी मारत नव्हते. धीरेंद्र शास्त्री आणि विनोद बाबा यांच्या भेटीचा फोटो चुकीच्या महितीसह शेअर केला जात आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये धीरेंद्र शास्त्री एका महीलेला मिठी मारत आहेत, असा दावा युजर्स करत आहे. फोटो शेअर करताना ते लिहितात की, “जे लोक आशारामा, रामपाल, राम रहीम यांना पूजत होते, ते आज शर्मेने जगत आहेत. बागेश्वर धामला पूजणारे देखील काही दिवस थांबा.”

मुळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) हे महिलेला मिठी मारत नव्हते.

संस्कार टीव्ही चॅनलने आपल्या फेसबुक पेजवर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये धीरेंद्र शास्त्री आणि विनोद बाबा यांची भेटी घेताना दिसतात. सोबतच देवकीनंदन ठाकुरदेखील होते. हे फोटो  20 मे 2022 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

हा धागा पकडून अधिक माहिती घेतली असता कळाले की, विनोद बाबा यांनी आपल्या अधिकृत युट्युब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 19 मे 2022 रोजी कथाकार देवकीनंदन ठाकूर आणि धीरेंद्र शास्त्री आपल्या सहकाऱ्यांसह विनोद बाबा यांना भेटण्यासाठी पीली पोखर मथुरा मधील एक नगर बरसाना  उत्तर प्रदेशमधील मथुरा राज्याच्या बरसाना नगरातील पीली पोखरमधील ‘प्रिया कूंज’ या आश्रमला गेले होते.

खालील दोन्ही फोटोमधील दंडावरील भस्माचे चिन्ह आणि केसांची ठेवन बघितल्यावर लक्षात येते की, दोन्ही फोटोमधील व्यक्ती एकच आहे. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये धीरेंद्र शास्त्री हे महिलेला मिठी मारत नव्हते. ते विनोद बाबा यांना भेटले होते. चुकीच्या दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:धीरेंद्री शास्त्री यांनी महिलेला मिठी मारली का? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False