सरकारने भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी केली का ? वाचा सत्य

False Social

राम मंदिर प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार 22 जानेवारी रोजी भगवान रामची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी करणार आहेत, या दाव्यासह एका नोटेचा फोटो व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील नोट बनावट आहे. भारत सरकारने असा कोणताही निर्णय दिलेला नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये 500 रुपयांच्या नोटवर भगवान राम आणि अयोध्येतील राम मंदिर दिसते.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “जय जय श्री राम 22 जानेवारी पासून नवीन नोट बाजारात.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतला असता तर ही सर्वत मोठी बातमी ठरली असती परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर ‘भारत सरकराने भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.’ अशी बातमी आढळत नाही.

व्हायरल फोटोमध्ये नोटीवर (@raghunmurthy07) असे लिहिलेले दिसते.

हा धागा पकडून सर्च केल्यावर कळाले की, रघु मूर्ती नामक व्यक्तीने भगवान राम 500 रुपयांच्या नोटेवरील हा फोटो एडिट केलेला आहे.

हा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल झाल्यानंतर मूर्तीने त्याचे खंडण केले की, “हा फोटो मी एडिट केला असून ही माझी फक्त एक कल्पना आहे. कृपया चुकीची माहिती पसरवू नये.”

आरबीआयचे खंडण

फॅक्ट क्रेसेंडोने आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितल की, “भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट आरबीआयने जारी केलेली नाही.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे. सरकारद्वारे अशी कोणतीही नोट जारी करण्यात आलेली नाही. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सरकारने भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी केली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False