सत्य पडताळणी : संबित पात्रा फुटपाथवर बसुन गरीब कुटूंबासोबत खरंच जेवले का?

False राजकीय | Political

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरात बसून उज्ज्वला गॅस योजनेमार्फत मिळालेल्या गॅस वर बनवलेलं जेवण खाताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा, असं लिहिलेली आणि ते फुटपाथवर बसून जेवण करत असतानाचा फोटो असलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधील फोटोची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

संबित पात्रा या फोटोबाबत तथ्य पडताळणी करताना आम्हाला 2015 मध्ये इंडियन एक्स्प्रेस

मध्ये प्रसिध्द झालेले एक वृत्त आढळले. या वृतात पदपथावर जेवण बनविणाऱ्या एका महिलेचे छायाचित्र आहे.

आक्राईव्ह लिंक

त्यानंतर या छायाचित्रात संबित पात्रा कुठून आले असा प्रश्न आम्हाला पडला. त्यासाठी आम्ही गुगलवर या छायाचित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्यासमोर खालील छायाचित्रे आली.

ही छायाचित्रे नेमके कुठली आहेत याची पडताळणी केली असता ती ओडिशातील पिपली गावातील असल्याचे समोर आले. संबित पात्रा यांनी 31 मार्च 2019 रोजी या ठिकाणी तेथील भाजपचे उमेदवार अर्षित पट्टनायक आणि अन्य कार्यकर्त्यांसोबत जेवण केले होते. या फोटोत छेडछाड करुन ते मुंबईतील माहीम येथील छायाचित्रात मिसळण्यात आले आहे. खाली आपण मूळ छायाचित्र आणि फोटोत फेरबदल केलेले छायाचित्र पाहू शकता.

संबित पात्रा यांच्या ट्विटर अकाऊंटवरही हे फोटो टाकण्यात आले आहेत.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

संबित पात्रा यांनी पदपथावर बसून जेवण केल्याचा व्हायरल करण्यात येत असल्याच्या फोटो फेरबदल करुन तयार करण्यात आला आहे. संबित पात्रा यांची मूळ छायाचित्रे ही ओडिशातील आहेत. पदपथाचे छायाचित्र हे मुंबईतील माहीमचे आहे. या दोन्ही छायाचित्राच्या आधारे फेरबदल केलेले छायाचित्र तयार करून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे संबित पात्रा यांनी पदपथावर बसून जेवण केल्याचे व्हायरल करण्यात येत असलेले हे छायाचित्र असत्य आहे.  

Avatar

Title:सत्य पडताळणी : संबित पात्रा फुटपाथवर बसुन गरीब कुटूंबासोबत खरंच जेवले का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False