
चंद्रशेखर गोखले यांचं #सुखद निधन अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. गोखले यांच्याबाबत काय घडलं, त्यांचं खरंच निधन झालंय का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
चंद्रशेखर गोखले यांच्याबाबत हा ट्रेंड का सुरू झाला आणि नेमके काय घडले, याचा शोध आम्ही सुरु केला. त्यावेळी चंद्रशेखर गोखले हे नेमक कोण आहेत याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी चंद्रशेखर गोखले यांच्याविषयी माहिती विकीपीडियावर आम्हाला दिसून आली.

आम्हाला News18 Lokmat च्या एका पोस्टखाली चंद्रशेखर गोखले यांची एक टिप्पणी दिसून आली. गोखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर गोखले यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर हा ट्रेड सुरू झाल्याचे यावरुन लक्षात येते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई आणि पुणे पोलिसांना नमूद करत हा जो कोणी चंद्रशेखर गोखले त्याने माफी मागावी, असे म्हटले.
चंद्रशेखर गोखले यांनी त्यानंतर फेसबुकवरुन सर्वांची माफी मागितली आहे. पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या मृत्यूच्या अफवेबाबतचा खुलासाही त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन केला आहे.
निष्कर्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या संतप्त प्रतिक्रियेतून चंद्रशेखर गोखले यांचा निषेध म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी स्वत: याचे खंडन केले असून शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत चंद्रशेखर गोखले यांच्या मृत्यूच्या पोस्ट असत्य आढळल्या आहेत.

Title:तथ्य पडताळणी : चंद्रशेखर गोखलेंच खरंच निधन झालंय का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
