कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचे छायाचित्र गजानन महाराजांचा फोटो म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

संतनगरी शेगाव येथे 3 मार्च रोजी गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन पारंपरिक रित्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला एका व्यक्तीचे पाय पडताना दिसते. दावा केला जात आहे की, हा फोटो गजानन महाराजांचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो गजानन महाराजांचा नसून कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये कोही लोक आणि महिला एका व्यक्तीच्या पाया पडताना दिसते. फोटोमध्ये लिहिले आहे की, “शेगावच्या गजानन महाराजांचे दुर्मीळ फोटो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमची देवाकडे जी ईच्छा असेल ती पुर्ण होईल.”

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “शेगांव चे गजानन महाराज.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो गजानन महाराजांचा नाही.

हा फोटो गजानन महाराजांच्या नावाने व्हायरल झाल्यावर अविनाश सावरकर नामक फेसबुक युजरने या दाव्याचे खंडण करत सांगितले की, “व्हायरल फोटो कोकणमधील कणकवलीतील भालचंद्र महाराज यांचा आहे.” दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी भालचंद्र महाराजांचे इतर ही फोटो शेअर केले.

मूळ पोस्ट – फेसबुक

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या वेबसाईटवर त्यांचे आणखी फोटो आढळले. या संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांच्याची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “व्हायरल फोटो भालचंद्र महाराजांचा असून तो भक्तांच्या संग्रहातील आहे.” 

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला गजानन महाराज आणि भालचंद्र महाराज या दोघातील फरक कळेल.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो गजानन महाराजांचा नसून कोकणमधील कणकवलीतील भालचंद्र महाराजांचा आहे. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

Avatar

Title:कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचे छायाचित्र गजानन महाराजांचा फोटो म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading