FACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का?

Update: 2021-06-17 16:18 GMT

सुपरफास्ट इंटरनेटसेवा प्रदान करणारे ‘5-जी’ तंत्रज्ञान लवकरच येणार आहे. काही देशांमध्ये ‘5-जी’ सेवा सुरू झालेली आहे, तर भारतात चाचणी टप्प्यात आहे. परंतु, लागू होण्यापूर्वीच ‘5-जी’विषयी चुकीची माहिती पसरविली जात आहे.

दावा केला जात आहे की, ‘5-जी’ रेडिएशनमुळे पक्ष्यांचे बळी जाणार. ‘5-जी’मुळे पक्षी मरणार, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

सध्या उपलब्ध माहितीनुसार, दावा निराधार असल्याचे समोर आले. ‘5-जी’मुळे पक्षी मरतात, याला कोणाताही पुरावा नाही.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम

तथ्य पडताळणी

नेदरलँडमध्ये ‘5-जी’मुळे शेकडो पक्षी मरण पावले, अशा पोस्ट 2018 मध्ये व्हायरल झाल्या होत्या. तेथील ‘द हेग’ शहरात नोव्हेंबर 2018 मध्ये 339 मृत पक्षी आढळले होते. या पक्षांच्या मृत्यूवरून उलटसुलट दावे करण्यात येऊ लागले.

नेदरलँडच्या ज्या कंपनीने ही ‘5-जी’ चाचणी केली होती त्यांनी स्पष्ट केले होते की, मृत पक्षी आढळले त्या भागात ‘5-जी’ टॉवर लावण्यात आले नव्हते. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 दरम्यान त्या जागेभोवती 5-जी’ची चाचणी करण्यात आली नव्हती.

तेथील महापालिका प्रशासनाने व तज्ञांनी याविषयी तपास करून ‘5-जी’मुळे या पक्षांचा मृत्यू झालेला नाही, असे सांगितले होते. या पक्षांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, असे तपासाअंती नमूद करण्यात आले होते.

मूळ बातमी - Wageningen Bioveterinary Research (WUF)

विशेष म्हणजे ‘5-जी’ तंत्रज्ञान येण्याआधीदेखील जगात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांच्या अशा गूढ मृत्यूच्या घटना घडत आहेत. दरवेळी अशा घटनांनंतर कन्स्पिरसी थेअरीजचा सुळसुळाट सुरू होतो.

‘5-जी’ तंत्रज्ञानामध्ये जी फ्रिक्वेन्सी वापरली जाते ती International Commission on Non-Ionizing Radiation Protection (ICNRP) ने घालून दिलेल्या सुरक्षा मर्यादेच्या आतमधील आहे.


ALSO READ: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही


‘3-जी’ आणि ‘4-जी’ तंत्रज्ञानाइतकीच ‘5-जी’ची एक्सपोजर लेव्हल असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही, असे ICNRP चे चेअरमन डॉ. एरिक रॉन्जेन यांनी सांगितले होते.

अमेरिकेतील अग्रगण्य पक्षी संवर्धन करणारी संस्था द नॅशनल ऑड्युबॉन सोसायटीतर्फे 5-जी आणि पक्ष्यांचा मृत्यू यासंबंधी सविस्तर संशोध असणारा लेख प्रसिद्ध केलेला आहे. यात स्पष्ट म्हटले आहे की, ‘5-जी’ रेडिएशनमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत नाही.

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील जीवभौतिक शास्त्रज्ञ जो किर्श्विंक यांनी माहिती दिली होती की, 10 MHz पेक्षा वरच्या रेडिओ लहरी पक्षांना हानीकारक नसतात.

मूळ लेख - Audubon

लेखात पुढे म्हटेल आहे की, जॉन कुहेल्स या व्यक्तिती ‘5-जी’मुळे पक्षी मरतात अशी खोटी थेअर सर्वप्रथम पसरविली होती. कुहेल्स कायम ‘5-जी’ विरोधात काही ना काही कन्स्पिरसी थेअरी त्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करीत असतो.

विशेष म्हणजे 2018 साली रजनीकांत अभिनीत ‘2.0’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अशा दाव्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. परंतु, अद्याप अशा दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

युनिसेफ’च्या वेबसाईटवर ‘5-जी’विषयीच्या विविध फेक न्यूजचे खंडन करणारा प्रकाशित झालेला आहे.


ALSO READ: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही


जागतिक आरोग्य संघटनेने मोबाईल फोनमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 1996 साली इंटरनॅशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड्स प्रोजेक्टची सुरुवात केली होती.

याअंतर्गत वैज्ञानिकांनी संशोधक करून निर्वाळा दिला की, गेल्या दोन दशकांच्या अध्ययनाअंती मोबाईल फोनमुळे आरोग्यावर कोणताही घातक परिणाम होत नाही.

मूळ रिपोर्ट– जागतिक आरोग्य संघटना

विशेष म्हणजे दरम्यान, ‘5-जी’मुळे कोरोना पसरतो असेदेखील दावे केले जात होते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याविषयी खुलासा केला होता की, हे दावे खोटे आहे. ‘5-जी’मुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही.

कोणताच विषाणून रेडिओ लहरींमधून प्रसार करू शकत नाही. कित्येक ‘5-जी’ नसलेल्या देशांमध्येसुद्धा कोविड-19 पसरलेला आहे. त्यामुळे ‘5-जी’ आणि कोरोना यांचा काही संबंध नाही.


ALSO READ: राजीव दीक्षित यांच्या नावे 5-जी नेटवर्कविरोधातील पोस्ट कितपत खरी आहे?


कोविड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून उडणारे तुषार आणि त्यांतील छोटेछोटे थेंब या विषाणूचा फैलाव करतात.

संसर्ग झालेल्या व्यक्तीची शिंक, खोकला, खाकरणे, जोराचा श्वासोच्छ्‌वास यातून उडालेले सूक्ष्म तुषार आणि त्यामधले अतिसूक्ष्म थेंब अन्य व्यक्तींच्या श्वासमागार्ने शरीरात गेले, तरीही हा संसर्ग होतो.

निष्कर्ष

‘5-जी’मुळे पक्षांचा मृत्यू होतो, या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. सोशल मीडियावर ‘5-जी’विषयी तसा दुष्प्रचार केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:FACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का?

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News