लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल मिळणार नाही; भ्रामक दावा व्हायरल

Update: 2024-10-16 14:10 GMT

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल दिले जाणार,असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

काय आहे दावा ?

युजर्स ही पोस्टमध्ये शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लाडकी बहिण योजनेअंतर्गत या महिलांना मिळेल मोबाईल गिफ्ट.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने अशी कोणी घोषणा केली असती तर ही मोठी बातमी ठरली असती परंतु, कीव्हर्ड सर्च केल्यावर महाराष्ट्र सरकारने या संबंधित कोणतीही अधिकृत माहिती किंवा जीआर जारी केल्याचे आढळत नाही.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील ‘महिलांना मोबाईल गिफ्ट मिळेल असे कुठेही आढळत नाही.

लाडकी बहिण योजनेच्या पात्रते संबंधित माहिती येथे वाचू शकता.

उदय सामंतच्या नावाची चर्चा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल दिले जाणार, अशी घोषण केल्याची चर्चा होत आहे.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधील राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत महिलांना मोबाईल वाटप केले आहेत.

उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर रत्नागिरीमधील राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत महिलांना मोबाईल वाटप करतानाच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

उदय सामंत यांनी 1 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये मोबाईल वाटप कार्येक्रमातील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “उम्मेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन संवर्धन अभियानांतर्गत स्मार्ट फोनचे वितरण.”

https://x.com/i/broadcasts/1LyxBgDMXdkKN

या व्हिडिओमध्ये 0:34 मिनिटापासून पुढे सामंत म्हणतात की, "एक वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये मी सीआरपीएफची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी मागणी केली की, सीआरपीएफ यांना शासनाला कामाची माहिती एपद्वारे द्यावी लागते. परंतु, उपस्थित महिलांपैकी 60 टक्के महिलांकडे स्वता:चा मोबाईल नाही. रायगड आणि रत्नागिरीचा पालकमंत्री या नात्याने जिल्यातील सर्व सीआरपी महिलांना मोफत मोबाईल देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2 हजार 400 महिलांना मोफत मोबाईल मिळले आहेत.”

उदय सामंत यांनी 1 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील हीच माहिती देतात. अधिक मिहिती येथे वाचू शकता.

अर्थात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केलेली नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, महाराष्ट्रसरकार लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केलेली नाही. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केवळ रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सीआरपीएफ महिलांना मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  लाडकी बहिण योजनेअंतर्गत या महिलांना मिळेल मोबाईल गिफ्ट
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE
Tags:    

Similar News