
सोशल मीडियावर एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, केरळमध्ये व्हीआयपी कंपनीने ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कार करणारी जाहिरात प्रसारित केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेच्या कपाळवरून टिकली काढून डोक्यावर ओढणी टाकतो. सोबत म्हटले जात आहे की, ईदनिमित्त व्हीआयपी कंपनीने ही जाहिरात तयार केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप व्हीआयपी बॅग्सची जाहिरात नसून मल्याळम अभिनेता व अभिनेत्रीने एका गाण्याचे केलेले रिक्रिएशन आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “केरळ मध्ये व्हीआयपीची ईद निमित्ताने केलेली जाहिरात! पुन्हा लव्ह जिहादचे प्रमोशन किती अपमानास्पद आहे हे. हा माणूस चक्क बिंदी काढतो. आणि या जिहादी स्टोरीचा सुटकेस बॅगशी काय संबंध ?? व्हीआयपी बायकॉट करायला पाहिजे”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्व प्रथम व्हायरल क्लिपमधील दिसणारे Puffington Ghost हे शब्द सर्च केल्यावर एक फेसबुक अकाउंट आढळले. परंतु हे अकाउंट हटवण्यात आले आहे.
जाहिरात संदर्भात कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हीआयपी सुटकेसची निर्मिती करणारी कंपनी स्कायबॅग्सने सोशल मीडियावर या वादग्रस्त व्हिडिओचे खंडन केलेले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कंपनीने एक पत्रक जाहिर करून स्पष्टे केले की, “व्हीआयपी बॅग्स कंपनीने अशी कोणती ही जाहिरात केली नाही. तसेच जाहिरात प्रसारित करणाऱ्यांशीदेखील त्यांचा काही संबंध नाही. स्काय बॅग आणि व्हीआयपी ब्रॅण्डचे नाव आणि लोगो वापरून बेकायदेशीर जाहिरात प्रसारित केली जात आहे. या विरोधान कंपनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.”
पुढे अधिक माहितीसाठी व्हिडिओमधील काही कीफ्रेम्सना रिव्हर्स इमेजद्वारे सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमध्ये मल्याळम अभिनेत्री सुमी रक्षिक व अभिनेता विष्णू विजयन आहेत.
दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट आणि व्हिडिओमधील काही फोटो आपण खाली पाहू शकता.

वरील फोटोमध्ये कुठेच स्काय बॅग आणि व्हीआयपी ब्रॅण्डचे नाव किंवा लोगो दिसत नाही.
व्हायरल व्हिडिओ कोणतीही जाहिरात नसून हे ‘सूफीयम सुजातायम’ या मल्याळम चित्रपटातील “वथिक्कलु वेल्लारीप्रवु” या गाण्याचे रिक्रिएशन आहे.
सुमी रक्षिक यांनी या गाण्याच्या रिक्रिएशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CrQnh3pJjdL/?utm_source=ig_web_copy_link
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल क्लिप व्हीआयपी बॅग्सची जाहिरात नसून मल्याळम अभिनेता व अभिनेत्रीने एका गाण्याचे केलेले रिक्रिएशन आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:व्हीआयपी कंपनीने लव जिहादचा पुरस्कार करणारी जाहिरात केलेली नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
