Coronavirus: भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये दोन दिवसांत 1000 बेडचे हॉस्पिटल उभे केले का? वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

भारतीय लष्कराच्या मदतीने राजस्थानमध्ये एक हजार  बेड व शंभर व्हेंटिलेटर असणारे रुग्णालय केवळ दोन दिवसांत तयार करण्यात आले, अशा दाव्यासह काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. यात म्हटलेय की, चीनमध्ये कोरोनासाठी दहा दिवसांत हॉस्पिटल बांधले होते. भारतीय लष्काराने दोनच दिवसांत ही कामगिरी करून दाखविली. फॅक्ट क्रेसेंडोने याची तपासणी केली असता हा दावा खोटा ठरला.

काय आहे पोस्टमध्ये?

Darade-1.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

गुगल आणि यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे सर्व फोटो जुने आहेत. ते राजस्थानमधील नसून, त्यांचा सध्या सुरू असलेल्या कोरोनाशी काही संबंध नाही. यातील फोटोंचे सत्य आपण पाहू.

फोटो क्र. 1

भारतीय जवानांचा हा फोटो 2015 साली नेपाळमध्ये भूकंप झाला होता तेव्हा काठमांडू येथे उपाचार केंद्र स्थापन केले होते तेव्हाचा आहे. या केंद्रातील सैन्यसदस्यांचा हा फोटो आहे. संरक्षण खात्याच्या मुख्य प्रवक्त्यांनी 28 एप्रिल 2015 रोजी हा फोटो ट्विटरवर शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

फोटो क्र. 2

हा फोटो अमेरिकेच्या हवाई दलाने कॅलिफोर्नियातील एका हवाईतळावर 2008 साली उभारलेले 200 बेडचे मोबाईल फिल्ड हॉस्पिटलचा आहे. तेथील मार्च एअर रिझर्व्ह बेस (MARCH ARB) येथे ही फॅसिलिटी उभारण्यात आली होती. MARCH ARB च्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती दिलेली आहे. 

Sena-1.png

मूळ फोटो येथे पाहा – MARCH ARB

फोटो क्र. 3

हा फोटो जर्मन लष्कराच्या मॉड्युलर रेस्क्यू सेंटरचा आहे. हा फोटो लष्कराच्या वैद्यकीय बातम्या आणि लेखांमध्ये सर्रास वापरला जातो. अशा प्रकारच्या इस्पितळांना मोबाईल फिल्ड हॉस्पिटल म्हणतात. हा फोटोदेखील भारतातील नाही. 

German.png

मूळ फोटो येथे पाहा – ManzomatMilitary Medicine

हे फोटो तर सध्याचे नाही. मग लष्कराने खरंच असे काही हॉस्पिटल तयार केले का याचा शोध घेतला. तेव्हा लष्करानेच या वृत्ताचे खंडन केल्याचे आढळले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करून राजस्थानमध्ये 1000 खाटांचे हॉस्पिटल बांधल्याचा मेसेज खोटा असल्याचे सांगितले. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, भारतीय लष्काराने दोन दिवसांत राजस्थानमध्ये 1000 खाटांचे हॉस्पिटल तयार केल्याचा दावा खोटा आहे. स्वतः आर्मीने ही फेक न्यूज असल्याचे सांगतले. पोस्टमध्ये सर्व फोटो जूने असून, एकही भारतातील नाही.

Avatar

Title:Coronavirus: भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये दोन दिवसांत 1000 बेडचे हॉस्पिटल उभे केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False