
सध्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये हे अमेरिकेने जारी केलेल्या 50 ईमानदार नेत्यांच्या यादीमधील पहिले नाव आहे पंतप्रधान ‘ नरेंद्र मोदी ’असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, अमेरिका मे जारी 50 ईमानदार नेताओ की सूची मे भारत के मात्र एक व्यक्ती है, वो श्री नरेंद्र मोदी है, वो भी प्रथम स्थानपर।
या संदर्भात आम्ही गुगलवर शोध घेतला. त्यानंतर अमेरिकेने 26 एप्रिल 2019 पर्यंत अशी कोणतीही यादी जाहीर केलेली नाही ज्यामध्ये 50 ईमानदार नेत्यांची नावे आहेत.
त्यानंतर जगातील विविध यादींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव कोणकोणत्या यादीमध्ये आहे हे शोधले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे FORTUNE 2015 या मॅगझीनमध्ये जगातील 50 महान नेत्यांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमाकावर नाव समाविष्ट झाले होते. (The world’s 50 greatest leaders)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2017 मध्ये जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये नाव आहे. (‘100 most influential people in the world’ )
डी डी न्यूज । अर्काईव्ह (31.05.2017)
- त्यानंतर 2018 मध्ये जगातील सर्वात शक्तीशाली लोकांच्या यादीमध्ये 9 व्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आहे. (The World’s most powerful people 2018)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव 2018 मध्ये गॅलप इंटरनॅशनलच्या सर्वेमध्ये आहे.
- (The Gallup International Survey )
The Gallup International Survey l अर्काईव्ह
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अमेरिकेने जारी केलेल्या 50 ईमानदार नेत्यांच्या यादीमधील पहिले नाव आहे पंतप्रधान ‘ नरेंद्र मोदी ’ हा दावा करण्यात आला आहे. परंतू संशोधनाअंती फॅक्ट क्रिसेंडोला असे आढळले की, अमेरिकेने अशा प्रकारची कोणतीही यादी जाहीरच केलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव या यादीमध्ये नाही.
निष्कर्ष : अमेरिकेने जारी केलेल्या 50 ईमानदार नेत्यांच्या यादीमधील पहिले नाव आहे पंतप्रधान ‘ नरेंद्र मोदी ’ हा दावा असत्य आहे.
