
निवडून येण्यासाठी मला मराठी मतांची गरज नाही, असे वक्तव्य खासदार गोपाळ शेट्टी यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
गोपाळ शेट्टी यांनी निवडून येण्यासाठी मला मराठी मतांची गरज नाही, असे विधान केले आहे का? याचा शोध घेत असताना आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत त्यांनी मराठी भाषिकांबद्दल काही विधाने केली आहेत 3 मिनिटे 33 सेकंद ते 5 मिनिटे 10 सेकंद या कालावधीत तुम्ही ही विधाने ऐकू शकता.
गोपाळ शेट्टी यांच्या विधानांचा अभ्यास करत असतानाच आम्हाला एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ दिसून आला. या वृत्तात ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या या फॅशन आणि ट्रेड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनविरोधी वक्तव्य केल्याचे वृत्त इकोनॉमिक टाईम्स ऑनलाईनने दिले आहे. या बातमीसोबतच त्यांनी शेट्टी यांचा व्हिडिओही प्ले केला आहे.

निष्कर्ष
गोपाळ शेट्टी यांनी वेळोवेळी वादग्रस्त विधाने केली आहेत. शेट्टी यांनी निवडून येण्यासाठी मला मराठी मतांची गरज नाही, असे विधान केल्याचे मात्र कुठेही दिसून येत नाही त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हे वृत्त असत्य आढळून आले आहे.

Title:तथ्य पडताळणी : गोपाळ शेट्टी म्हणाले का, निवडून येण्यासाठी मला मराठी मतांची गरज नाही
Fact Check By: Dattatray GholapResult: False
