पाकिस्तानी हवाई दलाचा विमान प्रशिक्षक कोसळल्याचा जुना फोटो ऑपरेशन सिंदूरशी जोडून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एका जखमी पाकिस्तानी पायलटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की,पाकिस्तानी पायलटला भारतीय नाग्रिकांनी पकडले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो जुना असून ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा नाही.

काय आहे दावा ? 

व्हायरल फोटोमध्ये एक जखमी पायलट दाखलले आहे.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तानी पायलट ला भारतीयांनी जिवंत पकडले !”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो ऑपरेशन सिंदूरच्या अधिचा आहे.

पाक-फजैया नामक पेजने 15 एप्रिल 2025 रोजी या घटनेचा व्हिडिओ इंस्टग्रामवर शेअर केला. तसेच एका फेसबुक पेजने हाच व्हिडिओ शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पाकमधील घटनेचा आणखी एक व्हिडिओ; दोन्ही वैमानिकांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना.”

इंस्टग्राम 

पुढे अधिक सर्च केल्यावर निओ प्लस आणि डिफेन्स आउटपोस्टने युट्यूबवर या घटनेची सविस्तर महिली आढळली. 

व्हिडिओमधील महितीनुसार 15 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानातील वेहारी येथे हवाई दलाचे एक विमान कोसळले होते.

समा टीव्ही, पाकिस्तान टुडे आणि डॉन वृत्ताच्या बातमीनुसार 15 एप्रिल रोजी पाकिस्तान हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे वेहारीच्या रट्टा टिब्बा परिसराजवळ कोसळले. दोन्ही वैमानिकांना किरकोळ दुखापत झाली. परंतु, ते सुरक्षितपणे बाहेर आले होते.

निष्कर्ष

व्हायरल फोटो जुना असून ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा नाही. 15 एप्रिल 2025 रोजी एक प्रशिक्षक पाकिस्तान हवाई दलाचे विमान चालवत असताना तांत्रिक बिघाडामुळे वेहारी परिसराजवळ कोसळले होते. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानी हवाई दलाचा विमान प्रशिक्षक कोसळल्याचा जुना फोटो ऑपरेशन सिंदूरशी जोडून व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *