
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 26 लोकांच्या नावांची यादी व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “ही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांची संपूर्ण यादी आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल यादी बनावट असून मूळ यादी वेगळी आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांची यादीचा दावा करत आहे.
युजर्स पोस्टमध्ये लिहितात की, “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांची संपूर्ण यादी, जी इंडिया टीव्ही न्यूजवर प्रसिद्ध झाली आहे: 1. मोहम्मद आसिफ – उत्तर प्रदेश 2. अनीस कुरेशी – उत्तर प्रदेश 3. फैसल खान – दिल्ली 4. सलीम बैग – राजस्थान 5. अनिल रॉय – बिहार 6. रमेश यादव – उत्तर प्रदेश 7. प्रदीप मिश्रा – उत्तर प्रदेश 8. आरिफ कुरेशी – उत्तर प्रदेश 9. प्रविण ठाकूर – हरियाणा 10. जमील अहमद – पंजाब 11. सुरेश कुमार – दिल्ली 12. मोहसिन शेख – महाराष्ट्र 13. अफजल अन्सारी – बिहार 14. मंजू शर्मा – राजस्थान 15. दीपक वर्मा – उत्तर प्रदेश 16. नाझिम खान – उत्तर प्रदेश 17. सुनील गुप्ता – बिहार 18. अस्लम मिर्झा – गुजरात 19. राकेश यादव – मध्यप्रदेश 20. शरीफ शेख – महाराष्ट्र 21. शाहीद हुसैन – दिल्ली 22. रियाज अहमद – जम्मू 23. मीनाक्षी त्रिपाठी – उत्तर प्रदेश 24. सलीम खान – उत्तर प्रदेश 25. नीरज वर्मा – हरियाणा 26. इर्शाद खान – दिल्ली. या २६ मृतांपैकी १५ जणांची नावे मुस्लिम आहेत. त्यामुळे जे लोक, विशेषतः काही मीडिया चॅनेल्स, म्हणत आहेत की “हल्लेखोरांनी आधी नावे विचारून नंतर हत्या केली”, हा दावा साफ खोटा ठरतो. सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी आणि फेक न्यूज पसरवणाऱ्या अशा “गोडी मिडिया” चॅनेल्सवर तातडीने कारवाई करावी. ही मिडिया जातीय तेढ आणि दंगली पसरवण्यासाठी प्रभावी माध्यम बनत चालली आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल यादी बनावट असून मूळ यादीतील नावे वेगवेगळी आहेत.
सरकारी सूत्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत आणि जखमींची अधिकृत यादी जाहीर केली असून मृतांमध्ये 26 जणांची पुष्टी केली आहे.
यादीनुसार, जीव गमावल्यांपैकी 25 गैर-मुस्लिम आहेत, तर सय्यद आदिल हुसेन शाह नामक एक स्थानिक मुस्लिम रहिवासी आहे. ज्याने एका दहशतवाद्याला रोखण्याचा प्रयत्न करताना आपला जीव गमावला. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
खालील मृतांची यादी इंडिया टूडे, मींट, इंडिया टीव्ही आणि झी न्यूज (तेलगू) या माध्यमांनी आपल्या वेबसाईटवर शेअर केलेली आहे.
शिवाय, व्हायरल पोस्टमध्ये दावा केला आहे की, “इंडिया टीव्ही न्यूजने ही यादी प्रकाशित केली आहे.”
कीव्हर्ड सर्च केल्यावर इंडिया टीव्हीच्या वेबसाईटवर इतर माध्यमांनी शेअर केलेली एक मुस्लिम तर 25 गैर-मुस्लिम नावांची तीच यादी आढळली.
तसेच, इंडिया टीव्हीने 22 एप्रिल रोजी युट्यूब चॅनलवर एक बातमी दाखवली ज्यामध्ये 26 पैकी 16 मृतांच्या नावाची यादी दाखवण्यात आली. तसेच 2 विदेशी पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगितले.
परंतु, या ठिकाणी इंडिया टीव्हीने व्हायरल पोस्टमधील यादी दाखवली नाही.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल यादी बनावट आहे. मूळ यादीमध्ये 26 गैर-मुस्लिम आणि एक स्थानिक मुस्लिम रहिवासी सय्यद आदिल हुसेन शाह याचा समावेश आहे. खोट्या दाव्यासह यादी व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांची नावे म्हणून खोटी यादी व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
