Edited Video Viral: अरविंद केजरीवाल यांनी डॉ. आंबेडकरांचा आपमान केला नाही; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी सर्व पक्षांचे संविधान वाचले आहेत. काँग्रेसचा संविधान सांगतो की, पक्ष सदस्यांना दारु पिण्यास मनाई आहे. आम्ही बसलो होतो आणि कोणीतरी म्हटलं की, ज्याने संविधान लिहिलं त्याने दारू पिऊन लिहले असेल.” 

दावा केला जात आले की, अरविंद केजरीवाल या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत असून त्यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. 

मूळ व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल भारतीय संविधान किंवा डॉ.आंबेडकर यांच्या बद्दल बोलत नाही, तर काँग्रेस पक्षाच्या घटने बद्दल बोलतात.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अरविंद केजरीव म्हणतात की, “आम्ही बसलो होतो आणि कोणीतरी म्हटलं की ज्याने संविधान लिहिलं त्याने दारू पिऊन लिहिले असेल.”

व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कसा अपमान केला जात आहे बघा ! आंबेडकर विरोधी आम आदमी पार्टी.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आंबेडकर विरोधी आप.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.

शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी 23 डिसेंबर रोजी व्हिडिओची मोठी आवृत्ती अपलोड केली.

खालील दीर्घ आवृत्तीचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, अरविंद केजरीवाल काँग्रेस पक्षाच्या घटनेबद्दल बोलत होते, भारतीय राज्यघटना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाही.

आर्काइव्ह

आम आदमी पार्टीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर 3 डिसेंबर 2012 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओची संपूर्ण आवृत्ती आढळली. 

व्हिडिओमध्ये वर अरविंद केजरीवाल 25 नोव्हेंबर 2012 रोजी राजघाट येथे लोकांना संबोधित करत होते.

या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या घटनेबद्दल बोलताना दिसतात.

‘आप’ची घटना इतर पक्षांपेक्षा कशी वेगळी आहे. या संदर्भात बोलताना केजरीवाल म्हणतात की, “काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाच्या घटनेनुसार दारू पिण्यास बंदी आहे. आम्ही बसलो होतो आणि कोणीतरी म्हटलं की ज्याने संविधान लिहिलं त्याने दारू पिऊन लिहिलं असेल.”

व्हायरल व्हिडिओ 4:46 मिनिटावर पाहू शकतो.

‘आप’ची कारवाई

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार अरविंद केजरीवाल यांचा क्लिप केलेला व्हिडिओ शेअर केल्याबद्दल काही सोशल मीडिया युजर्स विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात 2012 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी ‘दारू पिऊन संविधान लिहिले.’ हे वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या घटने संदर्भात केले होते. खोट्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:Edited Video Viral: अरविंद केजरीवाल यांनी डॉ. आंबेडकरांचा आपमान केला नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered