“खोटं बोलून राज्य करणे हा भाजपचा अजेंडा”; पंतप्रधानांच्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल

राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपलाच घरचा आहेर देत “गरीबांना खोटी स्वप्न दाखवून राज्य करणारा पक्ष” असे म्हटल्याचा दावा एका क्लिपसोबत केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य भाजपविषयी नव्हे तर, काँग्रेसला उद्देशून म्हटले होते.

काय आहे दावा ?

12 सेकंदाच्या क्लिपमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, “गरिबांना फक्त स्वप्न दाखवा, खोटं बोला, त्यांच्यात भांडणं लावा आणि राज्य करणे.” 

व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, “आमचे हेच तर कामच आहे, जे काही करायचे आहे करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप आसामच्या बोकाखाट शहरात 21 मार्च 2021 रोजी झालेल्या सभेची आहे.

या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करीत आसामच्या जनतेला काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले होते.

भाजपाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर आपण संपूर्ण भाषण पाहू शकतात.

वरील भाषण पाहिल्यावर कळते की, नरेंद्र मोदींनी भाजपला उद्देशून “खोटं बोलून राज्य करणारा पक्ष” म्हटले नव्हते.

मूळ व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, “50 वर्षांपेक्षा जास्त आसामवर राज्य करणारी लोक आजकाल 5 आश्वासने देत आहेत. आसामची जनता या लोकांना चांगले ओळखते. या लोकांना खोटे आश्वसन देण्याची, घोषणा पत्र काढण्याची सवयच आहे. गरीबांना फक्त खोटी स्वप्ने दाखवणे,  खोटं बोलणे आणि लोकांना आपआपसात भांडण लावणे व राज्य करणे, हे नेहमीच काँग्रेसचे सत्तेत राहण्याचे सुत्र राहिलेले आहे. आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की, काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनाची शाश्वती.”

ते पुढे म्हणतात की, “आज काँग्रेसचे नेते कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या काँग्रेसचा खजिना संपत चालला आहे. तो भरण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे. त्यांची मैत्री फक्त सत्तेशी आहे. त्यांना ना विजन आहे, ना काही करण्याची संकल्प आहे, फक्त सत्ता संकल्प करणे हाच त्यांचा उद्योग आहे.”

हे वक्तव्य आपण इथे पाहू शकतात.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “गरिबांना फक्त स्वप्न दाखवा, खोट बोला, त्या आपआपसात भांडणे आणि राज्य करणे” हा भाजपचा अजेंडा आहे, असे म्हटले नव्हते. हे वक्तव्य त्यांनी  काँग्रेसला उद्देशून केले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:“खोटं बोलून राज्य करणे हा भाजपचा अजेंडा”; पंतप्रधानांच्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered