सलमानने दिला पाकिस्तानला दणका ! : सत्य पडताळणी

एंटरटेनमेंट खरी न्यूज I Real News

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खानने याने आपले आगामी नोटबुक आणि भारत हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. खास रे या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सविस्तर वृत्त आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता

खासरे  आक्राईव्ह लिंक

खास रे डॉट कॉमच्या फेसबुक पेजवर या पोस्टला दोन हजार सातशे लाईक्स आहेत. यावर 38 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही पोस्ट 122 जणांनी शेअर केली आहे.

आक्राईव्ह लिंक

सत्य पडताळणी

सौजन्य : जागरण

सौजन्य : अमर उजाला

विविध वृत्तपत्रांमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर सलमान खानने पाकिस्तानबाबत उचलेल्या मोठया पाऊलाबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त आपण खाली देण्यात आलेल्या लिंकवर वाचू शकता.

जागरण l अर्काइव्ह

अमर उजाला l अर्काइव्ह  

अभिनेता सलमान खान याने स्वत: याबाबत ट्टविट केले आहे. ट्विटवर आपल्या भावना व्यक्त करताना सलमानने शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Twitter l अर्काइव्ह

निष्कर्ष : सर्व तथ्यांचा अभ्यास केला असता, अभिनेता सलमान खान याने पुलवामा हल्ला निषेधार्थ आपला आगामी चित्रपट पाकिस्तान येथे प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणी हे वृत्त खरे आढळले आहे.

Avatar

Title:सलमानने दिला पाकिस्तानला दणका ! : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True