ट्वीट केलेला मजकूरः

“मोदी सरकार को चार साल पूरे हो गए हैं लेकिन जनता को इन चार साल में जो मिला उसका जनता स्थानीय BJP नेताओं को दे रही है। मोहल्ले में जब जनता के बीच BJP के नेता पहुंचे तो उसके बाद क्या हुआ, इस वीडियो में देखिए.”

“मोदी सरकारने 4 वर्ष पूर्ण केलेले असले तरी मागील चार वर्षांत सरकारकडून लोकांना जे काही प्राप्त झालेले आहे जनता तेच स्थानिक भाजपा नेत्यांना परत देत आहे. भाजपाच्या नेत्याने स्थानिक लोकांना भेट दिल्यानंतर काय झाले ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा."

https://twitter.com/twitter/statuses/1000441200648716289

मोदी सरकार को चार साल पूरे हो गए हैं लेकिन जनता को इन चार साल में जो मिला उसका जवाब जनता स्थानीय BJP नेताओं को दे रही है।

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु या चार वर्षांत जनतेला जे काही प्राप्त झाले त्याचे उत्तर जनता भाजपाच्या स्थानिक नेत्यांना देत आहे.

मोहल्ले में जब जनता के बीच BJP के नेता पहुंचे तो उसके बाद क्या हुआ, इस वीडियो में

देखिए..

भाजप नेते मोहल्ल्यात लोकांमध्ये पोहोचले त्याच्यानंतर काय घडले ते या व्हिडिओमध्ये पहा.

आमच्या तपासणीनुसार, सांगण्यात/निहित करण्यात आले होते त्याप्रमाणे हा व्हिडिओ दिल्लीचा नव्हता आणि हा व्हिडिओ अलीकडील काळातील नव्हता. 5 ऑक्टोबर 2017 रोजी, न्यूज चॅनल टाइम्स नाऊ यांनी हा व्हिडिओ त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केला.

https://twitter.com/twitter/statuses/915920762405396480

बैठकीत असतांना भाजपा पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांच्यावर दार्जिलिंग येथे एका अज्ञात युवकांनी केला हल्ला

आणि, 5 ऑक्टोबर 2017 रोजी टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली की–

“कोलकाता: भाजपाचे पश्चिम बंगालचे युनिट प्रमुख दिलीप घोष यांच्यावर गुरुवारी निर्वासित गुरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) नेते बिनय तमांग ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शांतता व स्थिरतेला कोणतीही हानी न पोहचवता दार्जिलिंग सोडण्याची ताकीद दिली होती, त्यांच्या समर्थकांद्वारे जाहीरपणे विरोध करण्यात आला.

स्वतंत्र राज्याच्या मागणीमुळे झालेल्या अशांततेनंतर घोष यांच्या डोंगराळ भागातील तीन दिवसीय भेटीदरम्यान ही घटना घडली.

जेव्हा घोष दार्जीलिंग येथे पोहोचले तेव्हा तमांग यांच्या समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध विरोध प्रदर्शन आयोजित केले होते. तथापि घोष यांनी ते डोंगराळ भागात या समस्येस भडकवण्यास आले होते, या आरोपांचे खंडन केले आहे. खरगपूर येथील आमदाराने तमांगला "विश्वासघातकी" म्हणले

बिनय तमांग यांच्या समर्थकांद्वारे घोष यांचे 'गो बॅक (परत जा)' चे नारे आणि काळया ध्वजांनी स्वागत करण्यात आले. त्यांच्या सहकार्‍यांवर उघडपणे हल्ला केला गेला. दिलीप यांनी स्वत: चौक बाजार पोलीस ठाण्यात आश्रय घेतला. नंतर पक्षाने आपला तीन दिवसीय कार्यक्रम रद्द केला. या घटनेसाठी घोष यांनी सत्ताधारी टीएमसीवर आरोप केले."

थोडक्यात, हा व्हिडिओ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि राजकीय पक्षाविरुद्ध पक्षपाती प्रतिमा तयार करण्यासाठी वापरला गेलेला आहे.