कावडी वाल्यांकडून नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या अलीकडील घटनांमुळे, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्यापकपणे फिरत आहे.

या व्हिडिओमध्ये हिंसाचार आणि विध्वंसक कृती, आणि पोलिसांबरोबर भांडणे करणाऱ्या पुरुषांचा जमाव दाखविण्यात येत आहे.

हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुक वर बऱ्याच प्रमाणात शेअर आणि फॉरवर्ड केला गेला आहे.

हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यापैकी काहींनी दावा केला आहे की, कावडी वाल्यांकडून हिंसाचाराचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि ही घटना अलीकडेच दिल्लीमध्ये घडली आहे.

परंतु हा व्हिडिओ 2017 चा आहे. हाच व्हिडीओ इथे बघितल्या जाऊ शकतो :

हा न्यूज 24 चॅनेल द्वारे अपलोड केलेल्या न्यूज रिपोर्टचा एक भाग होता आणि 20 जुलै 2017 रोजी अलाहाबाद-वाराणसी जीटी रस्त्यावर ही घटना घडलेली आहे.

इतर तथ्य तपासणी साइट्सने सुद्धा हा खोटा असल्याची पुष्टी केली आहे.

अल्ट न्यूज:

कावडी वाल्यांकडून हिंसाचाराचा जुना व्हिडिओ अलीकडील घटना म्हणून सोशल मीडियावर शेअर केला.