व्हायरल ऑडिओमधील आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाही; वाचा सत्य

Missing Context राजकीय | Political

सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका भाषणाचा ऑडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हा ऑडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आवाजातील दुसऱ्या गोलमेज परिषदेतील भाषणाचा आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ऑडिओ 2000 मध्ये प्रदर्शीत झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामधील अभिनेत्याचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह भाषण एकू येते.

युजर्स हा ऑडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ आवाज (दुसरी गोलमेज परिषद, लंडन, १९३१)”

https://archive.org/details/scrnli_lkJeQeb996OMNa

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल ऑडिओ एका चित्रपटातील आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही 2000 साली जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेली बायोपिक आहे. 

खालील या चित्रपटामध्ये 97 व्या मिनिटावर व्हायरल ऑडिओ पाहू शकतात.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयच्या वेबसाईटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या संग्रहाच्या भाग – 2 मध्ये व्हायरल ऑडिओमधील संपूर्ण भाषण आढळले. आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1930 रोजी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील पाचवी बैठकीत ‘दलित वर्गासाठी राजकीय सत्तेची गरज’ असल्याचा मुद्दा मांडला होता. 

हे संपूर्ण भाषण येथे 529-535 पान क्रमांकावर उपलब्ध आहे.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायोपिकमधील ऑडिओ वापरला आहे.

डॉ. आंबेडकरांनी 1955 मधील बीबीसीला दिलेल्या मुलाखत दिली होती. या मुलाखतचे संग्रहीत ओडियो बीबीसीने 17 मार्च 2023 रोजी नव्याने शेअर केले. 

खालील व्हिडिओमध्ये आपण त्यांचा खरा आवाज ऐकू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ऑडिओ दुसऱ्या गोलमेज परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आवाजातील भाषण नाही. हा आवाज 2000 मध्ये प्रदर्शीत झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बायोपिकमधील त्यांची भूमिका साकारणारा मल्याळी अभिनेता मामुट्टीचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल ऑडिओमधील आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Missing Context