
एका वयोवृद्ध महिलेचा नृत्य करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, त्यामध्ये नाचणारी महिला अभिनेत्री वैजयंतीमाला आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये नाचणारी महिला वैजयंतीमाला नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ या हिंदी गाण्यावर नाचताना दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहितात की, “प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमला आता 98 वषाॅची झाल्या, पण जगण्याची इच्छा इतकी प्रबळ!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट एबीपी लाईव्हने 6 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित केल्याचे आढळले.
या बातमीमध्ये व्हिडिओमधील दिसणारी वृद्ध महिला 93 वर्षांची असल्याचे सांगितले आहे. परंतु, ही महिला अभिनेत्री वैजयंतीमला असल्याचा उल्लेख केलेला नाही.
अधिक सर्च केल्यावर अनेक या प्रकाशित बातम्यांमध्ये नरेंद्र सिंह नामक ट्विटर अकाउंटचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार नरेंद्र सिंहने पहिल्यांदा हा व्हिडिओ 5 डिसेंबर 2022 रोजी ट्विट केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “वयाच्या ९३ व्या वर्षी, शम्मी कपूरची आजीवर जादू…”
अभिनेत्री वैजयंतीमला
अधिक सर्च केल्यावर आम्हाला अभिनेत्री वैजयंतीमला 2022 मध्ये आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार स्वकारतानाचा फोटो आढळला.
मूळ पोस्ट – आउटलुक इंडिया
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील महिला आणि वैजयंतीमला या दोन्ही वेगवेगळ्या आहेत.
सध्याच्या अफवा
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री वैजयंतीमला यांच्या मृत्यूची अफवा पसरत आहे. वैजयंतीमला यांचा मुलगा सुचिंद्र बाली यांनी मृत्यूच्या अफवांचे खंडन केले. अधिक माहिती येथे वाचू शकता.
सुचिंद्र बाली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंवर शेअर केले की, “डॉ. वैजयंतीमाला बाली यांची तब्येत चांगली आहे आणि अन्यथा सांगणारी कोणतीही बातमी खोटी आहे. शेअर करण्यापूर्वी, कृपया बातमीचा स्रोत सत्यापित करा.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये नाचणारी वृद्ध महिला वैजयंतीमाला नाही. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल व्हिडिओमध्ये नृत्य करणारी वृद्ध महिला अभिनेत्री वैजयंतीमाला नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
