कुंभवरुन दिल्लीला परतलेल्या ट्रेनच्या काचो तोडल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य 

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

महाकुंभचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अशातच एका व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या खिडक्या फोडताना दिसतात. दावा केला जात आहे की, कुंभमेळ्यावरून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर ‘हिंदूविरोधी घटकांनी’ हल्ला केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये जागा न मिळल्याने प्रवाशांनी तोडफोड केली होती.

काय आहे दावा ?  

व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या खिडक्या फोडताना दिसतात.

https://archive.org/details/scrnli_mM2FRm06h72721

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आधान हिंदी या युट्यूब चॅनलने 11 फेब्रुवारी रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मधुबनी रेल्वे स्थानकावर दगडफेक.”

न्यूज11 राजस्थाननेदेखील आपल्या युट्यूब चॅनलवर ही बातमी शेअर केली होती. रिपोर्टनुसार ही घटना बिहारच्या मधुबनी रेल्वे स्टेशनवर घडली होती. कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये जागा न मिळाल्याने त्यांनी बिहारच्या मधुबनी आणि समस्तीपूर रेल्वे स्थानकांवरील सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेसची तोडफोड केली होती.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ, आधान हिंदी आणि न्यूज11 राजस्थान युट्यूब चॅनलवरील ट्रेन एकच आहे.

काय आहे संपूर्ण घटना ?

बिहारच्या जयनगरहून प्रयागराजमार्गे नवी दिल्लीला जाणारी स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी मधुबनी रेल्वे स्टेशनवर आली होती. या वेळी महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या जमावाला ट्रेनमधील प्रवाश्यांनी चढू दिली नाही. या कारणामुळे जमावाने आवेशात येऊन 12 एसी कोचच्या खिडक्या फुटल्या. यामध्ये काही लोक किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

परंतु, या ठिकाणी कुठे ही हा हल्ला ‘हिंदूविरोधी घटकांनी’ केल्याचे सांगितले नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये ‘हिंदूविरोधी घटक’ ट्रेनवर हल्ला करत नाही. मुळात बिहारच्या मधुबनी रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना ट्रेनमध्ये चढू न दिल्याने भडकलेल्या लोकांनी तोडफोड केली होती. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कुंभवरुन दिल्लीला परतलेल्या ट्रेनच्या काचो तोडल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading