अनिल परब यांचा नितेश राणेंवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत उद्धव ठाकरेंना ‘नेपाळी वॉचमन’ म्हणाले, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. मुळात अनिल परब भाजप नेते नितेश राणेंवर टीका करत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अनिल परब म्हणतात की, माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे. तो संपूर्ण रात्र ‘जागते रहो – जागते रहो’ ओरडत असतो. त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत.

पुढे व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंचा ‘जागते रहो – जागते रहो’ बोलतानाची क्लिप दाखवली आहे. 

तसेच ग्राफिकमध्ये लिहिले की, “अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली !”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अनिल परब यांनी असे विधान केले असते तर ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, परब यांनी उद्धव ठाकरेंबद्दल असे वक्तव्य केल्याची बातमी माध्यमांमध्ये आढळत नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अनिल परब यांनी 25 मार्च रोजी विधानपरिषदेत केलेल्या भाषणाचा एक भाग होता.

अनिल परब यांचे संपूर्ण भाषण एकल्यावर कळते की, त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही.

व्हिडिओच्या 05 तास 51 मिनिटावर अनिल परब जीवन, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि समान न्याया बाबत बोलताना दिसतात.

अनिल परब म्हणतात की, “सर्वाना समान अधिकार आहे. जोपर्यंत माझ्या रहण्याचा, खाण्याचा व वागण्याचा दुसऱ्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते माझे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. परंतु, हल्ली जर कोणी मांसाहार करत असेल तर त्याला सोसायटीत घर मिळत नाही. मी काय खायच हा अधिकार माझा आहे. त्याचावर गदा अणण्याचा अधिकार कोणी दिला ? मटण हलाल किंवा झटक्याचे खायचे हे देखील मंत्री ठरवत आहेत. मंत्री म्हणतात की, “मल्हार असेल तर खायच नाहीतर नाही.” हा कायदा कोणी आणला ? हे दोन धर्मांमध्ये तेड निर्माण करण्याच काम आहे. सध्या महाराष्ट्रात जातीय दंगलीचे वातावरण तयार केले जात आहेत. मी हिंदू असून त्याचा माला अभिमान आहे. परंतु, मला मुस्लमानांचा द्वेष नाही. जे कोणी देशाच्या विरोधात काम करतील हिंदू असो किंवा मुस्लिम असो तो देशाचा शत्रू आहे. दुर्द्यवाने त्या वेळी (भुतकाळात) जे बॉम्ब ब्लास्ट झाले त्यात मुस्लिम समुदायचे लोक आढळले. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विरोधात विधाने केले होते. माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन संपूर्ण रात्र ओरडत जागते रहो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसाच एक नेपाळी महाराष्ट्रात असून त्याला देखील असे वाटते की, त्याच्या मुळे हिंदू धर्म टिकून आहे.”

हेच विधान आपण येथे एकू शकता.

या भाषणादरम्यान अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले आढळत नाही; तसेच परबांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे त्यांच्या जवळ येऊन बसतात.

काय आहे संपर्ण प्रकार ?

मल्हार हे मांसाहार पदार्थ हिंदू रिती रिवाजाने कापण्यात आले असून त्यात कोणतीही भेसळ नसल्याची याची शाश्वती देणारे प्रमाणपत्र आहे.

मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आता मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

अनिल परब याच पाठिंब्याचा विधानपरिषदेत विरोध करत होते.

माध्यमात चर्चा

अनिल परब यांनी विधानपरिषदेत भाषण करताना कोणाचे नाव घेतले नाही. परंतु, माध्यामांवर चर्चा आहे की, परब यांनी ही टीका भाजप नेते नितेश राणेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंवर नाही.

मूळ पोस्ट – महाराष्ट्र टाइम्स, एबीपी न्यूज, द इंडियान एक्सप्रेस, मिड डे

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये अनिल परब हे उद्धव ठाकरेंविरोधात बोलत नाही. मुळात परब नाव न घेता भाजप नेते नितेश राणेंवर टीका करत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अनिल परब यांचा नितेश राणेंवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *