
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरात उफाळून आलेला हिंसाचार आता शांत झाला आहे. यानंतर काही लोक मुस्लिम समुदायावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नागपूरचा असून दंगलींनंतर हिंदूंनी मुस्लिमांनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नागपूर हिंसाचाराशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात. व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “नागपूरमधील हिंदूंचा निर्णय.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नागपूरमधील हिंदूंचा निर्णय.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम संपूर्ण व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर 1:34 मिनिटावर एक व्यक्ती पूर्व दिल्ली जिल्ह्यातील गाजीपूर गावाचा उल्लेख करते.
तसेच 2:30 मिनिटावर रोहित गुर्जर नामक व्यक्तीच्या खून प्रकरणी न्याय मिळण्याबाबत बोतलाना दिसते.
हा धागा पकडून किव्हर्ड सर्च केल्यावर संजीव भाटी नामक युजरने 16 मार्च 2024 रोजी ह्याच व्हिडिओचे फेसबुकवर शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 9 मार्च 2024 रोजी दिल्लीतील गाजीपूर येथे मुस्लिम युवकांनी रोहित गुर्जर नामक युवकाची हत्या केली होती. त्या चारही फरार आरोपींना पकडण्याची मागणी परिसरातील लोकांनी केली होती.
https://www.facebook.com/share/v/14WhW3fHhi
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
डीसीपी (पूर्व) अभिषेक धानिया यांनी माध्यमांना दिलेल्या महितीनुसार रोहित गुर्जरची फुलांच्या बाजारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या दोन गटातील पैशांच्या वादातून झाली होती. नाझिम आणि तालिब अशा दोन अरोपींची ओळख पटली असून उर्वरितांचा शोध सुरु आहे.
रोहितच्या मित्र परिवारांनी आरोप केला आहे की, पोलिस प्रशासन अरोपींना पकडण्यासाठी सक्षम पावले उचलत नाही. त्यामुळे मृतकांच्या कुटुंबियांनी 10 मार्च रोजी दिल्ली-गाझियाबाद महामार्गावर निदर्शने केली होती. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
नागपूरमधील सध्याची स्थिती
नागपूरमध्ये 18 मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून हिंसाचार उफळला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात संचारबंदी लागू केली होती. परिस्थिती शांत झाल्यानंतर 23 मार्च रोजी संचारबंदी हटविण्यात आली.
या दंगलीचा कथित मास्टर माईंड फहीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच महापालिकेने फहीम खानच्या राहत्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली आणि त्याचे घर जमीनदोस्त केले. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ नागपूरचा नसून दिल्लीमधील गाजीपूरातील रोहित गुर्जरच्या खुच्या प्रकरणाशी संबंधित आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नागपूरच्या हिंसाचारानंतर मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याची मागणी? दिल्लीतील जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
