
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वयं सहाय्यक बिभव कुमारांनी मला मरहाण केली, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केला आहे.
याच पर्श्वभूमीवर एक व्यक्ती द्वारे महिलेले मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील स्वाती मालिवाल आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्वाती मालिवालांशी संबंधित नसून एका कौटुंबिक वादचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरूष महिलेचे केस ओढताना आणि तिला मारहाण करताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हेच ते दिल्लीच स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ स्वाती मालिवालांशी संबंधित नाही.
अंकुर गुप्ता नामक युजरने हाच व्हिडिओ ट्विटरवर 13 मे रोजी अपलोड केला होता. व्हिडिओसोबत दिलेल्या महितीनुसार ही मारहाण “दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या मध्यस्थी कक्षेत झाली.”
तसेच व्हिडिओमध्ये आपण मध्यस्थी करणारे वकीलदेखील पाहू शकतो.

वरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर ‘मिरर नाव’ या न्यूज चॅनलनेदेखील हाच व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की, “हा व्हिडिओ दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात मध्यस्थी कक्षेचा आहे. या ठिकाणी भांडन करणारे हे एकाच परिवाराचे लोक आहेत. हे लोक येथे वाद मिटवण्यासाठी गेले होते, वाद इतका वाढला की, एकमेकांशी भांडू लागले.”

मूळ पोस्ट – मिरर नाव
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयामध्ये झालेल्या कौटुंबिक वादचा असून स्वाती मालिवालांशी संबंधित नाही. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:स्वाती मालिवाल प्रकरणाशी जोडून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
