आदित्य ठाकरेंच्या कॅफेवर पोलिसांची कारवाही म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

False राजकीय | Political

आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर पोलिसांनी धाड टाकल्यावर गुप्त खोलीत लपलेल्या महिला सापडल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ आदित्य ठाकरेंशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस एका गुप्त खोलीतून महिलांना बाहेर काढताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अंधेरीतील आदित्य ठाकरे यांच्या कॅफे बियर बार शॉपच्या भूमिगत खोलीत पोलिसांनी छापा टाकला. मुंबईतील सर्वात मोठे लज्जास्पद सेक्स रॅकेट उघडकीस आले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम अशी कोणती घटना घडली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर पोलिसांनी धाड टाकल्याची कोणतीही बातमी अधिकृत माध्यामांवर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे.

नेशन टुडे  नावाच्या फोसबुक पेजने हाच व्हिडिओ 14 डिसेंबर 2021 रोजी शेअर केला होता.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील दीपा डान्स बारवर छापा टाकला. या ठिकाणी 17 बार डान्सर्ससह 22 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, इंडिया टूडेने 13 डिसेंबर 2021 रोजी प्रसारित केलेल्या बातमीनुसार, कोरोना काळात मुंबई पोलिसांनी अंधेरीतील दीपा बारवर छापा टाकला. या ठिकाणी एका गुप्त खोलीत लपून बसलेल्या 17 मुलींची सुटका केली आणि 20 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. अधिक माहिती येथे वाचू शकता.

खाली आपण पोलिसांनी बारवर छापा टाकल्याचे पाहू शकता.

पुढे आदित्य ठाकरे यांच्या मालकीच्या व्यावसायिक मालमत्ता तपासण्यासाठी त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासले. 

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीमध्ये त्यांची कोणतीही व्यावसायिक मालमत्ता नाही.

ठाकरे गटाची कारवाही

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांनी सायबर शाखेत गुन्हा नोंदवला असून आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “माझा या व्हिडिओशी संबंध नसून बदनामी करण्यासाठी खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. तसेच मी या विरोधात सायबर शाखेत गुन्हा दाखल करणार आहे.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी दीपा बारवर टाकलेल्या धाडीचा आहे. या व्हिडिओचा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आदित्य ठाकरेंच्या कॅफेवर पोलिसांची कारवाही म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False