
भारत-पाक संघर्षादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दावा केला जात आहे की, भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती दर्शवली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रसत्यावरील जाळपोळ दाखवलेली आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नाही.
हाकान तुलुहान नामक एका चॅनलने हाच व्हिडिओ 1 फेब्रुवारी 2025 रोजी युट्यूबवर शेअर केल्याचे आढळले.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “फिलाडेल्फियामध्ये कोसळलेले विमान!”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर आम्हाला 1 फेब्रुवारी रोजी फिलाडेल्फिया प्रशासनाने आपल्या वेबसाइटवर महापौर कार्यालयाद्वारे प्रकाशित केलेला एक रिपोर्ट आढळला.
रिपोर्टनुसार, लिअरजेट 55 मॉडेलचे हे वैद्यकीय विमान 31 जानेवारी रोजी फिलाडेल्फिया नॉर्थईस्ट विमानतळावरून संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मिसूरीकडे निघाले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते युनायटेड स्टेट्समधील फिलाडेल्फिया शहरातील ईशान्य भागात कॉटमन अव्हेन्यू आणि रुझवेल्ट बुलेव्हार्डजवळ कोसळले.
यामध्ये आई व मुलगा तसेच चार विमान कर्मचारी होते. त्या लहान मुलावर ईशान्य फिलाडेल्फियातील श्राइनर्स चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर त्याला मिसूरीतील स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन राष्ट्रीय विमानतळावरून मेक्सिकोला नेण्याचे नियोजन होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.
मूळ पोस्ट – सिटी ऑफ फिलाडेल्फिया
सदरील महितीच्या आधारे गुगल मॅप सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ फिलाडेल्फियामधील कॉटमन अव्हेन्यू भागातील डंकिन डोनट्स दुकाणासमोरील रस्ता आहे.
खालील तुलनात्म फोटो पाहिल्यावर आपल्याला कळेल की, व्हायरल व्हिडिओ आणि गुगल मॅप वरील रस्ता एकच आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नसून विमान अपघाताचा 31 जानेवारी रोजी अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात झाला होता. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ भारत – पाक संघर्षाशी जोडून शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अमेरिकेतील व्हिडिओ भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती म्हणून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
